Asia Cup 2025 पूर्वीच एसीसीला धक्का, BCCI ने घेतला मोठा निर्णय, रद्द होणार स्पर्धा?

Asia Cup 2025 पूर्वीच एसीसीला धक्का, BCCI ने घेतला मोठा निर्णय, रद्द होणार स्पर्धा?

Asia Cup 2025 : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आशिया कप 2025  स्पर्धेबाबत (Asia Cup 2025) अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे ही स्पर्धा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवीन अपडेटनुसार, 24 जुलैला ढाका (Dhaka) येथे आशियाई क्रिकेट परिषदेची महत्वाची बैठक होणार आहे मात्र या बैठकीपूर्वी बीसीसीआयने (BCCI) आणि इतर काही देशांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जर ही बैठक ढाका येथेच झाली तर या बैठकीला बीसीसीआय सहभागी होणार नसल्याचा स्पष्ट मेसेज बीसीसीआयकडून एसीसीला (ACC) देण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांना औपचारिकपणे कळवले आहे. भारत आणि बांग्लादेश दरम्यान सुरु असणाऱ्या राजकीय तणावामुळे बीसीसीआयकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले नाही तर बीसीसीआयसोबत श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ओमान देखील या बैठकीपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

बैठकीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

एसीसीच्या घटनेनुसार, जर प्रमुख सदस्य देश या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, तर बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, ही बैठक अनिर्णीत राहू शकते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या बैठकीत आशिया कप हा चर्चेचा मुख्य विषय असणार आहे.

आशिया कपवर परिणाम ?

माहितीनुसार ढाकामध्येच बैठक आयोजित करण्याचा अध्यक्ष नक्वी यांचा आग्रह आशिया कपबाबत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. आता बैठकीला फक्त पाच दिवस शिल्लक आहेत, परंतु बैठकीच्या ठिकाणी बदल करण्याबाबत एसीसीकडून अद्याप कोणतीही नवीन माहिती किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे, आशिया कपचे भविष्य अधांतरी आहे.

रविवारी अहिल्यानगरमध्ये मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube