पुण्यात सरकारी वकील प्रशिक्षण अन् संशोधन केंद्र; जाधवर ग्रुपचा पुढाकार; माजी मंत्री मुनगंटीवार करणार उद्घाटन

Sudhir Mungantiwar will inaugurate Training And Research Center For Government Lawyer : सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी पुण्यामध्ये (Training And Research Center For Government Lawyer) केंद्र सुरु होत आहे. यामध्ये 6 महिन्यांचा विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने (Jadhavar Group of Institutes) याकरिता पुढाकार घेतला आहे. शनिवार, दि. 5 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कोरेगाव पार्क येथील ‘हॉटेल ओ’मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात केंद्राचे उद्घाटन होईल, अशी माहिती इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी (Pune) दिली.
ठाकरेंनीही जय गुजरातचा नारा दिला होता; सरनाईकांनी थेट व्हिडिओचं दाखवला
सरकारी वकील होण्यासाठी परीक्षा तयारी, प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, अभियोजन संचालनालयाचे संचालक अशोककुमार भिलारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर, इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर (Pune News) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Video : शरद पवारही ‘जय कर्नाटक’ म्हणाले होते; शिंदेंची पाठराखण करताना फडणवीसांचा दाखला
यावेळी अभियोजन संचालनालयाच्या रश्मी नरवाडकर, ममता पाटील, सुप्रिया मोरे – देसाई, वैष्णवी पाटील, आनंद नारखेडकर, संगीता ढगे आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरकारी वकील होण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींविषयी आणि प्रशिक्षणाच्या विषयावर सर्व मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सरकारी वकिली क्षेत्रातील आव्हाने आणि संधी याविषयावर विचारमंथन या कार्यक्रमात होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होत असून सरकारी वकिलांचे 100 प्रमुख आणि विधी महाविद्यालयातील 40 निवडक विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सरकारी वकील होण्याकरिता 6 महिन्याचा कोर्स सुरु होत, यांच्या दोन लेव्हल असणार आहेत. त्याचे मान्यवरांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल, असेही त्यांनी सांगितले.