ठाकरेंनीही जय गुजरातचा नारा दिला होता; सरनाईकांनी थेट व्हिडिओचं दाखवला

ठाकरेंनीही जय गुजरातचा नारा दिला होता; सरनाईकांनी थेट व्हिडिओचं दाखवला

Uddhav Thackeray : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांच्या (Amit Shah) उपस्थितीत जय गुजरातचा नारा दिला. त्यांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षांनी खासकरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंना खिंडीत गाठण्याचे काम सुरू केले आहे. या नेत्यांकडून टीका होत असतानाच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी उद्धव ठाकरेंचा एक (Uddhav Thackeray) जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.

याबाबत मंत्री सरनाईक म्हणाले, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय आंध्र, जय कर्नाटक असं म्हणण्यात काय चुकीचं आहे. तुम्ही (उद्धव ठाकरे) सुद्धा गुजराती भाषेमध्ये बॅनर लावले होते. तुम्ही सुद्धा जय गुजरात म्हणाला होतात. संजय राऊत एकदा पाकिस्तानमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी जय पाकिस्तान म्हटले होते. निवडणूक आली की मराठी भाषा (Marathi Language) आठवते आणि नंतर गुजराती अशा शब्दांत सरनाईक यांनी ठाकरे गटावर टीका केली.

उद्धव ठाकरे भोंदू नाहीतर संधीसाधू

पुण्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र सोबत जय गुजरात म्हटल्यानंतर उबाठा गटाकडून टीका केली जात असतानाच आता शिवसेनेच्यावतीने अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून उद्धव ठाकरेंचा एका जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे ‘जय गुजरात’ म्हणत असल्याचे दिसते आहे. सोबत ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ अशीही टीका करण्यात आली आहे.

मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजराती मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.

एक तर हे भोंदू आहेत, नाही तर संधीसाधू! pic.twitter.com/mXEtLx25xK

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 4, 2025

Video : ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापूर्वी शिंदेंनी पेटवला नवा वाद; पुण्यात शाहंसमोर ‘जय गुजरात’ची घोषणा

नेमकं काय म्हणाले शिंदे ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात (Pune) जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा (Jayaraj Sports and Convention Center) उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. आपल्या भाषणाची सांगता करताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. आपल्या भाषणात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच पुण्यातील गुजराती समाजाच्या कार्याचाही गौरव केला. त्यांच्या याच वक्तव्यावर आता विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.

फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण

या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं, म्हणाजे शिंदे यांच गुजरातवर प्रेम व महाराष्ट्रावर प्रेम नाही असं होत नाही. शरद पवारांनीही अशी एकदा कर्नाटकच्या लोकांमध्ये घोषणा दिली होती. (Shinde ) त्यामुळं इतका संकुचीत विचरा कुणी करत असेल तर ते चुकीच आहे. आता विरोधकांना मुद्दे नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखन करून विरोधकांना सुनावलं आहे.

Video : ‘जय गुजरात’मुळं राजकारण तापलं; पवारांचा दाखला देत फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube