Download App

भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याल १ लाखाहून अधिक पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

  • Written By: Last Updated:

Airports Authority of India Bharti 2024 : अनेकजण आज सरकारी नोकरीच्य (Govt Job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दरम्यान नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नुकतीच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India) कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती एकूण 490 रिक्त पदांसाठी राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्जांची ऑनलाइन नोंदणी करण्याची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना आहे तरी काय? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? 

एकूण जागा – 490

रिक्त जागांचा तपशील-
कनिष्ठ कार्यकारी (सिव्हिल) – 3 पदे
कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य अभियांत्रिकी) – 90 पदे
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) – 106 पदे
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) – 178 पदे
कनिष्ठ कार्यकारी (आयटी अभियांत्रिकी) – 13 पदे

शिंदेंची पुन्हा कोंडी! दहावी-बारावीच्या विद्यार्थांचा विचार करत जरांगेंनी जाहीर केला मायक्रो प्लॅन 

शैक्षणिक पात्रता-
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या कनिष्ठ कार्यकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

वय श्रेणी :
या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 वर्षे आहे. याशिवाय, कमाल वयोमर्यादा SC/ST साठी पाच वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

पगार –
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या कनिष्ठ कार्यकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40000 रुपये ते 1,40000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

आवेदन शुल्क –
AAI कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये निश्चित केले आहे. तसेच एससी, एसटी, /PWBD/महिला उमेदवार आणि AAI प्रशिक्षणार्थी ज्यांनी एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांना अर्ज शुल्कामध्ये सुट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची लिंक – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/85992/login.html

जाहिरात – https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/Rectt%20Advt%20%20throw%20GATE%202024.pdf

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. कारण, उमेदवारांनी अर्जात चुकीची माहिती दिल्यास किंवा अर्ज दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास अर्ज बाद केल्या जाईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा. उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांनुसारच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

follow us