Download App

आता सुनेला सासूचा नाही तर, ‘AI’ चा सासुरवास?; खरगपूरच्या पोट्ट्यानं बनवलं खास टूल….

AI tool for roti roundness : AI आल्यापासून दररोज नवनवीन बातम्यांचा ते विषय झाले आहे. त्यातच आता आणखी भर पडली आहे. ती म्हणजे AI ने आता थेट किचनमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामुळे सुनांना सासुरवास नक्की होऊ शकतो. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण तुम्ही ऐकलं ते एगदी खरं आहे. कारण आता AI चं एक खास टुल आलं आहे. ज्यामुळे पोळीचा आकार गोल आहे की, नाही हे तपासले जाणार आहे.

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

तंत्रज्ञान आणि विशेषतः AI च्या जगात तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा अनोखा संगम झाल्याचं पाहायाला मिळत आहे. ज्यामुळे कधी-कधी कल्लोळ देखील माजतो. असाच प्रकार आता AI ने आता थेट किचनमध्ये प्रवेश केल्याने होणार आहे. हा प्रकार नेमका काय? पाहुयात… आता AI च एक खास टुल आलं आहे. ज्यामुळे पोळीचा आकार गोल आहे की, नाही हे तपासले जाणार आहे.

अनमोल बिश्नोई… व्हिडिओ कॉल अन् बाबा सिद्दीकींची हत्या, मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

हे खास टुल आयआयटी खरगपूरचा विद्यार्थी अनिमेष चौहान ने तयार केलं आहे. त्याचं नावं rotichecker.ai असं म्हटलं आहे. सध्या सोशल मिडियावर हे टुल तुफान व्हायरलं होतं आहे. बेंगळुरू येथे राहणारा आयआयटी खरगपूरचा विद्यार्थी अनिमेष चौहान सध्या या टुलमुळे प्रचंड चर्चेत आहे.

हे टुल कसं काम करत? असा देखील प्रश्न विचारला जात आहे. तर हे टुल आगोदर पोळीचा गोलाकार स्कॅन करतं. त्याला 100 पैकी गुण देतं. हे टुल आपण गंमत म्हणून बनवलं होतं. मात्र ते तुफान व्हायरलं झालं लोकांना ते चकित करणारं ठरलं. आता त्याला लॉन्च करण्यासाठी उद्योजग देखील भेटतील. असं ही तो म्हणाला. तर दुसरीकडे नेटकरी या टुलचा प्रचंड आनंद घेत आहेत. सध्या त्यासाठी #GolRotiChalleng हा हॅशटॅग देखल ट्रेंड झाला आहे. लोक आपल्या पोळ्या आणि त्याला या AI टुलने दिलेले गुण देखील दाखवले जात आहेत. तर काही लोक या टुलच्या उपयोगितेवर देखी प्रश्न उपस्थित करत आहेत.

follow us