Download App

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला 24,960 रुपये पगार

  • Written By: Last Updated:

AIATSL Recruitment 2024 : अनेकजण आज सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रचंड स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने (Air India Air Transport Services Limited) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू केली आहे. नेमकी ही भरती कोणत्या पदासाठी आहे? या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.

Kingdom Of The Planet Of The Apes ची रिलीज डेट जाहीर, वानरांचं राज्य अनुभवण्यास सज्ज व्हा! 

पद आणि पदसंख्या :

युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी एकूण 130 रिक्त पदांची भरती केली जाईल.

तर हँडीमॅन/हँडीवुमनच्या एकूण 292 पदे भरली जाणार आहेत.
अशा एकूण Air India Air Transport Services Limited मध्ये युटिलिटी भरती करून घेण्यात येणार आहे.

Munmun Dutta : तारक मेहतामधील बबीताजींच्या दिलखेच अदा 

शैक्षणिक पात्रता-

युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे खालील शिक्षण असणे आवश्यक आहे –

उमेदवाराकडे SSC/10वी पर्यंतचे शिक्षण असावे. याशिवाय मुलाखतीला येताना उमेदवाराला त्याचा एचएमव्ही ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत आणावा लागेल.

तर हॅंडीमन /हँडीवुमन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे 10वी पर्यंतचे शिक्षण असावे. तसेच उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असावे. दोन्ही भाषा वाचता आणि बोलता आल्या पाहिजेत.

अधिकृत वेबसाइट – https://www.aiasl.in/index

अधिसूचना –
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Chennai%20%20Station.pdf

पगार
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला २४,९६०/- रुपये वेतन दिले जाईल. तर हँडीमॅन/हँडीवुमन या पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला 22,530/- रुपये वेतन मिळेल.

अर्ज प्रक्रिया-
वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
मुलाखतीला जाताना उमेदवारांनी त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
वरील पदांसाठी 2 आणि 4 मे 2024 रोजी मुलाखत घेण्यात येईल.

 

follow us