एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला मिळणार 45 हजार रुपये पगार

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला मिळणार 45 हजार रुपये पगार

AIATSL Recruitment 2024 : विमान सेवेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने (Air India Air Transport Services Limited) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.दरम्यान, दरम्यान, या भरती अंतर्गत एकूण किती रिक्त पदे भरल्या जाणार आहेत? निवड कशी होणार आहे? याच विषयी जाणून घेऊ.

Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय 

एकूण पदे – 74

पदांची संख्या –
ड्युटी मॅनेजर – 2
कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक – 1
ग्राहक सेवा कार्यकारी – 17
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – 10
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 6
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – 3
हॅंडीमॅन – 5
हॅंडीवूमन – 8

वयोमर्यादा
या पदभरतीसाठी उमेदवाराना अर्ज करण्याची वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता-
ड्युटी मॅनेजर – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि किमान 16 वर्षांचा अनुभव.

कनिष्ठ अधिकारी तांत्रिक –
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/मॅन्युफॅक्चरिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील पदवी.

’24 तास मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक…’; केजरीवालांनी जेलमधून जनेतला दिल्या ६ हमी 

ग्राहक सेवा कार्यकारी –
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून [10+2+3] मोडमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी –
कोणत्याही बोर्डातून 10वी + 2री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर –
SSC/10वी पास

रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह –
राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/मॅन्युफॅक्चरिंग/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईलमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.

हॅंडीमॅन SSC/10वी उत्तीर्ण

हॅंडीवूमन SSC/10वी उत्तीर्ण

पगार –
18 हजार ते 45 हजार रुपये महिना

अधिकृत वेबसाइट – https://www.aiasl.in/index

 

अधिसूचना –
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Dehradun%20&%20Chandigarh%20Station..pdf

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
Air India Air Transport Services Limited च्या रिक्त पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.
रिक्त पदांसाठी 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत घेण्यात येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज