’24 तास मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक…’; केजरीवालांनी जेलमधून जनेतला दिल्या ६ हमी

’24 तास मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक…’; केजरीवालांनी जेलमधून जनेतला दिल्या ६ हमी

Sunita Kejriwal Speech : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा (Arvind Kejriwal) यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे २८ पक्ष दिल्लीत एकत्र आले आहेत. यावेळी झालेल्या लोकतंत्र बचाव सभेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता (Sunita Kejriwal) यांनी भाषण केलं. त्यांनी केजरीवाल यांचा संदेश उपस्थित जनतेला वाचून दाखवला.

Amrita Khanwilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरचा क्लासिक लूक पाहून चाहते घायाळ 

यावेळी सभेला संबोधित करतांना सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, मोदींना माझ्या पतीला तुरुंगात टाकले. पंतप्रधांनानी योग्य केलं का? केजरीवालांनी राजीमाना द्यावा का? केजरीवाल हे सच्चे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. ईडीने त्यांना तुरुंगात टाकलं आहे. पण, खूप काळ ते त्यांना तुरुंगात ठेवू शकणार नाहीत. ज्या हिम्मतीने आणि धैर्याने ते देशासाठी लढत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात ज्या पद्धतीने लोकांनी बलिदान दिलं, काम केलं. त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल देशासाठी काम करत आहेत, असं त्या म्हणाल्या.

Girish Mahajan : बंडखोरीवरून जुंपली! “बंडखोरांना रोखता येत नाही”; महाजनांचे गुलाबरावांना प्रत्युत्तर 

यावेळी मंचावर सोनिया गांधी, राहुल गांधी, लालू यादव, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला यांच्यासह सुमारे 28 नेते रॅलीच्या मंचावर उपस्थित आहेत.

केजरीवाल यांचा संदेश

माझ्या प्रिय भारतीयांनो,

तुरुंगातून तुमच्या मुलाचा आणि भावाचा तुम्हाला प्रणाम… मी मते मागत नाही. मी कोणाला हरण्याची किंवा जिंकूण देण्याविषयी बोलत नाही. फक्त एक नवा भारत घडणव्यासाठी मदत मागत आहे. १४० कोटी नागरिकांना नवा भरात करण्यासाठी निमंत्रण देत आहेत. भारत हा एक महान आणि गौरवशाली देश आहे. हजारो वर्षाचा इतिहास या देशाला आहे. तरी आपण मागास का आहोत? गरीब का आहेत? मी इथे तुरुंगात आहे. इथे विचार करायला खूप वेळ आहे. मी भारत मातेचा विचार करतो. भारत माता दुःखी आहे. वेदनेने कण्हत आहेत. काण, महागाईमुळे लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही. चांगले शिक्षण मिळत, त्यामुळं भारत मातेला असहाय्य वाटते. काही नेते हायफाय जीवन जगतात, देशाला लुटतात त्यांचा भारत माता द्वेष करते.

केजरीवाल म्हणाले- आपण मिळून नवा भारत घडवूया. असा भारत जिथे प्रत्येक हाताला काम मिळेल. कोणीही गरीब राहणार नाही. उच्च-नीच भेद असणार नाही. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. सर्वांना चांगले उपचार मिळतील. २४ तास वीज मिळेल. दळवणवळाची सुविधा असेल. चांगले रस्ते असतील. भारत हे जगातील शिक्षणाचे केंद्र असेल. भारताचे अध्यात्म जगामध्ये पसरवेल. सर्वांना न्याय मिळेल. मी देशातील 140 कोटी जनतेला असा भारत बनवण्याचे आवाहन करतो.

सहा गॅरंटी
देशभरात २४ तास वीज

गरिबांना मोफत वीज मिळेल

प्रत्येक परिसरात सरकारी शाळा

प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक

शेतकऱ्यांना एमएपीची हमी

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा

केजरीवाल म्हणाले- सर्व सहा हमी पाच वर्षांत पूर्ण होतील. पैसा कुठून येणार, याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तुरुंगात मी ठीक आहे. मला तुमच्या प्रार्थना सतत मिळत आहेत. ईश्वर माझ्यासोबत आहे. आपले आशीर्वाद ठेवा. भारतात हुकूमशाही चालणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू.

जय हिंद.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube