विरोधी पक्षाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरला! सी.पी. राधाकृष्णनांना टक्कर देणार ‘हा’ दिग्गज नेता

विरोधी पक्षाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरला! सी.पी. राधाकृष्णनांना टक्कर देणार ‘हा’ दिग्गज नेता

Opposition party’s Vice presidential candidate announced veteran leader MP Tiruchi Shiva will challenge C.P. Radhakrishnan : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) हे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे (NDA) उमेदवार असणार आहेत. त्यानंतर आता विरोधी पक्षाने देखील आपला उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. डीएमचेके खासदार तिरूची शिवा हे असू शकतात.

थोरातांवरही कायदेशीर कारवाई! किर्तनातील राड्यानंतर आमदार अमोल खताळ संतापले

याबाबत एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करताच इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. त्यानंतर या नवाची अधिकृत घोषणा केली जाईल.

ब्रिटीशांना मदत करणाऱ्यांना जमीन देणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या; शिरसाट रोहित पवारांच्या रडारवर

दरम्यान भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विरोधकांकडून एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची आपेक्षा करत होते. पण तसं झालं नाही. त्यासाठी एनडीएकडून विरोधकांशी संपर्क देखील साधण्यात आला होता.

उपराष्ट्रपतीपदासाठी सीपी राधाकृष्णन का?

सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील आहेत आणि ते गौंडर म्हणजेच ओबीसी समुदायाचे आहेत. पुढील वर्षी तामिळनाडूतमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांचं नाव जाहीर करून मोठी खेळी केली आहे. अनेक राज्यात सत्ता स्थापन केलेल्या भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये अद्याप तरी आपले पाय रोवता आलेले नसून आता आगामी निवडणुकींमध्ये दक्षिणेत सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आणि त्याची सुरूवात ते तामिळनाडूपासून सुरुवात करू इच्छितात कारण पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. राधाकृष्णन यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube