Kingdom Of The Planet Of The Apes ची रिलीज डेट जाहीर, वानरांचं राज्य अनुभवण्यास सज्ज व्हा!

Kingdom Of The Planet Of The Apes ची रिलीज डेट जाहीर, वानरांचं राज्य अनुभवण्यास सज्ज व्हा!

Kingdom Of The Planet Of The Apes release date announced : किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्स ( Kingdom Of The Planet Of The Apes) या हॉलिवूड चित्रपटाची रिलीज डेट ( release date ) जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट हॉलिवूडची सर्वात यशस्वी चित्रपट मालिका प्लॅनेट ऑफ द अप्सचा दहावा भाग आहे. ही चित्रपट मालिका 1968 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Alia Bhatt सोबत काम करण्याची शर्वरी वाघची इच्छा पुर्ण! ‘या’ चित्रपटात मिळाली संधी

पृथ्वीवर असणार वानरांचं राज्य…

किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्स (Kingdom Of The Planet Of The Apes) च्या अगोदर सहा वर्षांपूर्वी 2017 ला प्लॅनेट ऑफ द अप्समध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर आता किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्सच्या ट्रेलरमध्ये पृथ्वीवर जेव्हा मानवजात नसेल तेव्हा काय होईल याचं चित्रप दाखवण्यात आलं आहे. तर यामध्ये पृथ्वीचा असा भाग दाखवण्यात आला आहे. जो आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही. जेथे आदिमानव आणि वानरांचं राज्य आहे. तर मानव त्यांच्या पासून स्वतः ला वाचवत आहे.

हा चित्रपट लवकरच म्हणजे येत्या 10 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वेस बॉल यांनी केलं आहे. तर चित्रपटाचं शुटींग सिडनी, ऑस्टेलियामध्ये करण्यात आलं आहे. 2022 मध्ये हे शुटींग सुरू झालं होतं. तेव्हापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच हॉलिवूडचा असला तरी हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी हिंदी तमिळ आणि तेलुगू या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज