Kingdom Of The Planet Of The Apes चा टीजर रिलीज; पृथ्वीवर असणार वानरांचं राज्य

Kingdom Of The Planet Of The Apes चा टीजर रिलीज; पृथ्वीवर असणार वानरांचं राज्य

Kingdom Of The Planet Of The Apes : किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्स (Kingdom Of The Planet Of The Apes) चा हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट हॉलिवूडची सर्वात यशस्वी चित्रपट मालिका प्लॅनेट ऑफ द अप्सचा दहावा भाग आहे. ही चित्रपट मालिका 1968 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

पृथ्वीवर असणार वानरांचं राज्य…

किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्स (Kingdom Of The Planet Of The Apes) च्या अगोदर सहा वर्षांपूर्वी 2017 ला प्लॅनेट ऑफ द अप्समध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर आता किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्सच्या ट्रेलरमध्ये पृथ्वीवर जेव्हा मानवजात नसेल तेव्हा काय होईल याचं चित्रप दाखवण्यात आलं आहे. तर यामध्ये पृथ्वीचा असा भाग दाखवण्यात आला आहे. जो आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही. जेथे आदिमानव आणि वानरांचं राज्य आहे. तर मानव त्यांच्या पासून स्वतः ला वाचवत आहे.

Elvish Yadav : सर्पदंशाची नशा कशी असते?; जाणून घ्या शरीरावर काय होतो परिणाम

हा ट्रेलर 1.51 सेकंदांचा आहे. यामध्ये ओवेन टीग सीजरचा मुलगा आणि चित्रपटातील मुख्य वानर कॉर्नेलियसच्या आवाज येतो. त्यांच्यावर च हा चित्रपट आहे. कारण आता पृथ्वीवर निसर्गाचं राज्य असणार आहे. मानवाच्या हातून सत्ता काढून घेण्यात आली आहे. हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा आहे.

Elvish Yadav : रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवणारा एल्वीश यादव नेमका कोण?

हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वेस बॉल यांनी केलं आहे. तर चित्रपटाचं शुटींग सिडनी, ऑस्टेलियामध्ये करण्यात आलं आहे. 2022 मध्ये हे शुटींग सुरू झालं आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube