Elvish Yadav : सर्पदंशाची नशा कशी असते?; जाणून घ्या शरीरावर काय होतो परिणाम

  • Written By: Published:
Elvish Yadav : सर्पदंशाची नशा कशी असते?; जाणून घ्या शरीरावर काय होतो परिणाम

Elvish Yadav : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाचे विष पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वामध्ये आता अनेकांच्या मनात सर्पदंशाची नशा (Snake Bite) नेमकी कशी केल जाते आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच ही नशा केल्यावर त्याचा परिणाम किती काळ टिकतो याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. (What Is Snake Bite Why People Use for Addiction )

Elvish Yadav : एल्वीश यादववर गुन्हा दखल होताच अतुल लोंढेंना आठवला CM शिंदेंचा गणपती उत्सव

कशी केली जाते याची नशा?

सर्पदंशाची नशा केल्यानंतर शरीरावर याचा काय परिणाम होतो यावर चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चने नुकताच दोन मुलांवर अभ्यास केला. यात ज्यावेळी एखादी व्यक्ती सर्पदंशाचा नशा करते त्यानंतर काहीवेळात समोरील सर्व गोष्टी अस्पष्ट होण्यास सुरूवात होते. तसेच, याच्या नशेनंतर साधारण नशा करणाऱ्या व्यक्तीचे शरीर तासभर बधीर राहते. प्रमाणापेक्षा अधिक विषाचे सेवन केल्यास नशा करणाऱ्या व्यकीचा मृत्यूचादेखील धोका संभावू शकतो असे अभ्यासक सांगतात.

कशी केली जाते सर्पदंशाची नशा?

नाग, मण्यार यासारख्या मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या सापांच्या विषाचा वापर नशेसाठी केला जातो. सुरूवातीला अत्यंत अल्प प्रमाणात सापाचं विष इंजेक्शनद्वारे टोचलं जातं. हळू हळू विषाची मात्रा वाढवली जाते.सर्पविष घेतल्यानंतर गुंगी येते काही कालावधीनंतर याची चटक लागते. विषाचं प्रमाण जास्त झाल्यास मृत्युचा धोका संभावू शकतो.

Elvish Yadav : रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवणारा एल्वीश यादव नेमका कोण?

सर्पदंशाची नशा किती काळ टिकते?

सर्पदंशाची नशा केल्यानंतर याचा प्रभाव शरीरावर नेमका किती काळ टिकतो याबाबत इंटरनेटवर वेगवेगळी माहिती आहे. काही जणांच्या मते याची नशा केल्यानंतर शरीर तासाभरासाठी पूर्णपणे बधीर होते. तर, काहींच्या मते याचा हँगओव्हर साधारण पाच दिवस टिकतो. याचा नशा केल्यानंतर पहिले दोन दिवस याचा शरीरावर अधिक प्रभाव असतो. त्यानंतर याची नशा हळू-हळू कमी होत जाते असे सांगितले जाते.

भारतात अशाप्रकारच्या गोष्टीस बंदी

भारतात अनेक प्रकारच्या गोष्टींपासून नशा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यापैकीच एक सर्पदंशाचा नशा आहे. मात्र, यावर बंदी असतानाही मोठ मोठ्या पार्ट्यांमध्ये अवैधपणे याची नशा केली जाते. अशा प्रकारची नशा करताना एखादी व्यक्ती आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला त्याला कठोर शिक्षेला सामोरे जाण्याचे प्रावधान कायद्यात करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube