Blinkit Passport Size Photo : सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ घेण्यासाठी किंवा इतर आर्थिक कामासाठी आपल्याकडे पास पोर्टसाईज फोटो (Passport Size Photo) असणे आवश्यक असते मात्र जर त्यावेळी आपल्याकडे पोर्टसाईज फोटो नसेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आता क्विक कॉमर्स सर्विस देणारा ब्लिंकिटने (Blinkit) आपल्या यूजर्ससाठी नवीन सर्विस लाँच केली आहे.
ज्याच्या फायदा हजारो लोकांना होणार आहे. ब्लिंकिटचा वापर करून आता यूजर्स सहज घरी बसल्या बसल्या पासपोर्ट आकाराचे फोटो ऑर्डर करू शकणार आहे. मात्र यासाठी यूजर्सला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही आता घरी बसून तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो ब्लिंकिटवर कसे ऑर्डर करू शकता.
कंपनीने यूजर्ससाठी आपल्या ॲपमध्ये एक नवीन फीचर लाँच केले आहे. या नवीन फिचरच्या मदतीने कंपनी ग्राहकांना अवघ्या 10 मिनिटांत पासपोर्ट फोटो उपलब्ध करून देणार आहे. सध्या कंपनीकडून ही सर्विस दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सुरू करण्यात आली आहे. यूजर्सला10 मिनिटांत त्यांच्या पत्त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो मिळेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
या स्टेप्स करा फॉलो
तुम्हाला देखील ब्लिंकिटवरून पासपोर्ट आकाराचा फोटो ऑर्डर करायचे असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागेल.
सर्वप्रथम तुम्हाला ॲपवर जाऊन पासपोर्ट आकाराचा फोटो बनवण्याच्या पर्यायावर क्लीक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा फोटो तिथे अपलोड करावा लागेल.
यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता.
Manoj Jarange Patil : जरांगे पाटील सोमवारी नगर शहरात, असे असेल महारॅलीचे नियोजन
कंपनीची ही सर्विस 99 रुपयांपासून सुरू होते. या किमतीत 8 फोटो उपलब्ध होणार आहे.
तर 16 फोटोंसाठी 148 रुपये आणि 32 फोटोंसाठी 197 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे.