जनसन्मान यात्रेच्या रॅलीत अजितदादांचा हटके स्वॅग, पाहा बाईक राईड करतानाचे फोटो…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा सध्या हटके स्वॅग बघायला मिळत आहे.

जनसन्मान यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सिन्नरमध्ये एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. त्यावेळी अजितदादांनी मागे बसून बाईक राईड केली.

यावेळी सिन्नरमध्ये अजितदादांनी दुचाकीवरुन फेरफटका मारला. या रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि महिला पदाधिकारी देखील या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं दिसून आलं आहे.

आक्रमक, रांगडे दिसणारे अजितदादा आजही पिंक जॅकेटमध्ये अन् एका वेगळ्याच ढंगात पाहायला मिळाले.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे तसंच क्रांतिवीर भागोजी नाईक (पवार) यांच्या पुतळ्याला अजित पवारांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
