BMC License Inspector Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिकने (Brihanmumbai Municipal Corporation) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत अनुज्ञापन निरीक्षक (License Inspector) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रका काय? अर्ज करण्यसाठी शेवटची तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.
Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीचा मनमोहक अंदाज; फोटो चर्चेत!
अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या भरतीसाठी महापालिकेने इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 118 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत. अर्जाची प्रक्रिया 20 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे.
वयोमर्यादा-
अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांचे वय ४३ वर्षे असावे.
“जय भवानी’ शब्द ‘मशाल’ गीतातून काढणार नाहीच”; नोटीस धुडकावत ठाकरेंचा निवडणूक आयोगाशी पंगा
शैक्षणिक पात्रता-
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
अर्ज फी-
या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज फी म्हणून 900 रुपये भरावे लागतील. परीक्षा शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा (ONLINE MODE) देण्यात आली आहे.
अर्ज करण्याठी अंतिम तारीख – 17 मे
पगार
स्तर M17 नुसार अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 29200 रुपये 92,300 रुपये इतका पगार असेल.
अधिसूचना – https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/recruitment%20of%20inspector.pdf
अर्ज कसा करायचा?
– अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
– ऑनलाइन अर्ज पोर्टल https://portal.mcgm.gov.in वर जाऊन करावा लागेल.
– ‘उज्ज्वल संधींसाठी – सर्व नोकरीच्या संधींसाठी’ या टॅबवर क्लिक केल्यानंतर अर्ज उपलब्ध होईल.
– उमेदवारांनी अर्जात आपले सर्व तपशील भरावे.
– अर्जात चुकीची माहिती भरल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
– उमेदवार नियुक्तीसाठी विहित केलेल्या पात्रता आणि अटींची पूर्तता करत नसल्याचे आढळल्यास अनुज्ञापन निरीक्षक पदासाठीची त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.