Download App

BMW X4 : बीएमडब्ल्यूची नवीन लक्झरी कार लॉन्च; किती आहे किंमत आहे? जाणून घ्या…

BMW X4 : ऑटोमाबाईल्स क्षेत्रातील BMW कंपनीने आपल्या नव्या लक्झरी कारचे लॉंचिंग केलं आहे. BMW ची X4 xDrive M40i ही कार आता बाजारपेठेत आली असून सिंगल ट्रिममध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. या कारची शोरुम किंमत 96.20 रुपये असणार आहे. BMW ने अत्याधुनिक सुविधा या कारमध्ये दिल्या आहेत.

Supriya Sule : ‘मोदींच्या काळातच शरद पवारांना पद्मविभूषण’; सुळेंनीही सांगितली जुनी आठवण

कारची वैशिष्ट्ये काय आहेत?
या कारमध्ये किडनी ग्रिल, ग्रिल सराउंड, एक्झॉस्ट पाईप, खिडकीच्या सभोवताल आणि छताच्या रेल्सवर ग्लॉस मॅट ब्लॅक ट्रीटमेंट मिळणार आहे. ही कार ब्लॅक सॅफायर आणि ब्रुकलिन ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच कारला स्टॅगर्ड टायर सेटअप मिळणार आहे.

Ajit Pawar : सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणं देशाचा विकास; अजितदादांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

टायर सेटअपमध्ये 245/45-R20 फ्रंट आणि 275/40-R20 मागील रन-फ्लॅट टायर असून डबल-स्पोक अलॉय व्हील देखील काळ्या रंगात मिळणार आहेत. तसेच कारच्या आतमध्ये कार्बन-फायबर ट्रिम घटकांसह BMW चा Vernasca लेदर डॅशबोर्ड काळ्या किंवा नीलमणी लाल रंगात मिळणार असून हे मॉडेल M पॅकेजसह सुसज्ज आहे.

Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल

X4 M40i ही कार फक्त 4.9 सेकंदात 0-100kph वरून वेगाने धावू शकणार असून कारचा टॉप स्पीड 250 kph आहे. या कारची स्पर्धा Mercedes-AMG GLC 43 शी होणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

मोठी बातमी! अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 22 ठार तर 60 जण जखमी

ही कार सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही. GLC 43 चे जागतिक मॉडेल नुकतेच अद्ययावत करण्यात आले आहे, हे मॉडेल भविष्यात भारतातही लॉन्च केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, BMW देखील M40i-सारखी X3 SUV ऑफर करणार आहे. किंमत 87.7 लाख रुपये असणार आहे.

Tags

follow us