Download App

मेडिकल टुरिझम म्हणजे काय? भारतातच का येतात विदेशी रुग्ण? जाणून घ्या A टू Z माहिती..

Medical Tourism in India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. भारतात मेडिकल टुरिझममध्ये (Medical Tourism) वाढ करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोविड 19 नंतर मेडिकल क्षेत्रात भारताला जगभरात नवी ओळख मिळाली. अर्थमंत्री सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या मी खासगी क्षेत्राच्या भागीदारीने देशात मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येईल. कोरोना संकटनंतर देशाला आरोग्याच्या क्षेत्रात नवी ओळख मिळाली. भारत मेडिकल टुरिझम हब बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे मेडिकल टुरिझम? देशातील कोणते शहर यासाठी प्रसिद्ध आहे..

मेडिकल टुरिझम म्हणजे काय?

एखाद्या देशातील नागरिक उपचारांसाठी दुसऱ्या देशाची यात्रा करतात त्याला मेडिकल टुरिझम असे संबोधले जाते. मेडिकल टुरिझमचा ट्रेंड मागील काही वर्षात वेगाने वाढला आहे. अनेक देशांत आता याकडे एक इंडस्ट्री म्हणून पाहिले जात आहे. मेडिकल टुरिझममध्ये फक्त उपचारच नाही तर देखभालीशी निगडित अन्य घटकांचाही समावेश होतो. ट्रॅव्हलिंग, मुक्कामाची व्यवस्था, उपचारानंतरची देखभाल या गोष्टींचाही विचार केला जातो.

मेडिकल टुरिझमचा ट्रेंड का वाढतोय

विकसित देशांत मेडिकलच्या खर्च खूप जास्त असतो. त्यातुलनेत अनेक देशांत हा खर्च खूप कमी आहे. भारत, थायलंड, मलेशिया, मेक्सिको यांसारख्या देशांत उपचारांचा खर्च युरोप, अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी आहे. याच कारणामुळे अनेक लोक या देशांत जाऊन उपचार घेतात. काही देशांत विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धतींचा वापर केला जात आहे. यामुळे रुग्णांना चांगले उपचार मिळतात. हे देखील एक कारण यामागे आहे.

आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करताय? मग, आरोग्य नक्कीच धोक्यात; धक्कादायक अहवाल उघड

 

दर्जेदार औषधोपचारांची हमी

विकसित देशांप्रमाणे भारतातही मेडिकल टुरिझम वाढविण्यासाठी केंद्र सरकार काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. सिंगापूर, दक्षिण कोरिया, जर्मनीप्रमाणे भारतातही जागतिक पातळीवरील हॉस्पिटल्स आणि डॉक्टर आहेत. येथे विदेशातील रुग्णावर चांगले उपचार केले जातात. CDC च्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर मेडिकल टुरिझममध्ये बहुतांश लोक कॉस्मेटिक सर्जरी, फर्टीलिटी ट्रीटमेंट, डेंटल केयर, ऑर्गन आणि टिश्यू ट्रांस्प्लॅनटेशन आणि कॅन्सरवर उपचार घेतात.

 

भारतात कोणकोणत्या आजारांवर उपचार घेण्यासाठी लोक विदेशातून येतात याची माहिती घेऊ..

भारतात सक्षम रुग्णालये, कुशल डॉक्टर्स आणि लाखोंच्या संख्येत प्रशिक्षित नर्स आहेत. प्रत्येक वर्षी भारतात लाखो विदेशी नागरिक उपचारासाठी येत असतात. भारतात इराक, अफगाणिस्तान, मालदीव, ओमान, केनिया, म्यानमार, श्रीलंका या देशांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या व्यतिरिक्त अन्य देशांतूनही रुग्ण भारतात उपचारांसाठी येत असतात.

पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात लोक बोनमॅरो ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बायपास सर्जरी आणि गुडघ्याची सर्जरी करण्यासाठी येतात. युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतातील खर्च 30 टक्क्यांनी कमी आहे. मेडिकल सुविधांच्या बाबतीत भारत दक्षिण पूर्व आशियात सर्वात स्वस्त मानला जातो. अमेरिकेच्या तुलनेत भारतात मोर्टेलिटी रेट सुद्धा कमी आहे. एका अंदाजानुसार भारतात इन्फर्टिलिटीच्या उपचाराची किंमत युरोप आणि अन्य देशांच्या तुलनेत एक चतुर्थांश आहे. IVF आणि ART थेरेपीमुळे बहुतांश लोक भारतात उपचार घेणे पसंत करतात. विदेशातून येणाऱ्या रुग्णांना ई मेडिकल व्हीजा सारख्या सुविधा देखील भारताकडून उपलब्ध करून दिल्या जातात.

Joint Home Loan : जॉइंट होम लोन घेणे किती योग्य? जाणून घ्या, फायद्याचं गणित

भारतात किती स्वस्त आहे उपचार

भारतात IVF फर्टीलिटी उपचाराचा खर्च दीड ते तीन लाखांत केला जातो. फर्टीलिटी वर्ल्ड रिपोर्टनुसार अमेरिकेत या उपचारासाठी 18 हजार डॉलर ते 25 हजार डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो. भारतीय चलनात ही रक्कम 15 ते 21 लाख रुपये इतकी होते. भारतात लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च 20 लाख रुपयांपर्यंत येत येऊ शकतो. लंडनमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी 48 हजार युरो म्हणजेच 43 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

भारतात किती डॉक्टर्स अन् स्टाफ

नॅशनल मेडिकल कमिशनच्या जुलै 2024 मधील अहवालानुसार भारतात 13 लाख 86 हजार 136 अॅलोपथिक डॉक्टर्स आहेत. हे सर्व डॉक्टर्स स्टेट मेडिकल काउन्सिल आणि नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे नोंदणीकृत आहेत. भारतात आजमितीस 33 लाखांपेक्षा जास्त नर्स स्टाफ रजिस्टर्ड आहे. मेडिकल टुरिझमच्या बाबतीत भारतातील बंगळुरू, चंदीगढ, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, जयपूर, कोलकाता, तामिळनाडू या ठिकाणी जाऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आजमितीस मेडिकल टुरिझममध्ये भारत, जपान, स्पेन, दुबई, इस्राएल, अबुधाबी, सिंगापूर वेगाने पुढे जात आहेत. CDC ने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की दरवर्षी लाखो अमेरिकी नागरिक मेक्सिक, कॅनडा, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील देशांत उपचारासाठी जाणे पसंत करतात.

मेडिकल टुरिझममध्ये भारत कितवा?

मेडिकल टुरिझमचा विस्तार करण्यासाठी भारत सरकारने काही घटक निश्चित केले आहेत. यामध्ये भारताला एक वेलनेस डेस्टिनेशन रुपात एका ब्रँडच्या पद्धतीने विकसित करणे, ऑनलाईन मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल पोर्टल तयार करणे आणि वेलनेस टुरिझमला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या अहवालानुसार सन 2020-21 मध्ये 46 देशांच्या मेडिकल टुरिझम देशांच्या यादीत भारताचा दहावा क्रमांक होता. मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार भारतात युरोप, अमेरिका आणि अन्य देशांतून शिकून आलेले आरोग्य तज्ज्ञ आहेत. भारतातील रुग्णालयात बहुतांश नर्सिंग स्टाफ इंग्लिश भाषेत संभाषण करतात. ज्यामुळे विदेशी रुग्णांना जास्त अडचणी जाणवत नाहीत.

follow us