आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करताय? मग, आरोग्य नक्कीच धोक्यात; धक्कादायक अहवाल उघड
Long Work Hours : आजच्या जीवनात कामाचा दबाव आणि प्रतिस्पर्धा प्रचंड वाढली आहे. यामुळे स्वतःचे आरोग्य आणि पर्सनल लाईफकडे दुर्लक्ष करून तासनतास काम करण्याचा ट्रेंड भारतात वाढला आहे. विशेष करून तरुण वर्गात याचे प्रमाण खूप जास्त आहे. आपलं करिअर आणि रोजगार पक्का करण्यासाठी युवकांकडून कामावर भर दिला जातो. दर आठवड्यात 60 तास काम करण्यासही मागेपुढे पाहिले जात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की ही सवय तुमचे आरोग्य, मेंटल हेल्थवर अत्यंत प्रतिकूल परिणाम करते. भारताच्या आर्थिक सर्वेक्षणात याबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हटले आहे सर्वेक्षणात..
खुर्चीला चिटकून राहणारे सावधान
सरकारच्या या सर्वेमधून समोर आले आहे की 70 ते 90 तास काम करण्यावरून देशभरात चर्चा सुरू आहे. आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणे आरोग्यासाठी चांगले नाही असे या सर्वेत स्पष्टपणे म्हटले आहे. जे लोक दिवसातून 12 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ खुर्चीला चिटकून राहतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. एका आठवड्यात जर तुम्ही 55 ते 60 तासांपेक्षा जास्त काम करत असाल तर तुमचे आरोग्य धोक्यात आहे. या सर्वेत अनेक अभ्यासांचा दाखला देण्यात आला आहे ज्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
SEBI ने केला finfluencers चा ‘गेम’; यापुढे यूट्यूब अन् टेलिग्रामवर देता येणार नाही ‘स्टॉक टिप्स’
सर्वेत असे दिसून आले आहे की प्रॉडक्टीविटीवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. ऑफिसचा बॉस चांगला असला तरी महिन्यातले पाच दिवस कर्मचाऱ्यांचे कामात मन लागत नाही. असे का होते असा प्रश्न पडला असेल तर यासाठी कार्यालयाचे वातावरणच नाही तर कर्मचाऱ्यांच्या प्रॉडक्टीव्हीटीवर अनेक घटक परिणाम करत असतात. आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये कामकाजाच्या तासाबद्दल काही माहिती देण्यात आली आहे.
एल अँड टी कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी रविवारसह आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे 70 तास आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या (Gautam Adani) वक्तव्याचाही उल्लेख केला. आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी त्याला बर्न आऊट असे म्हटले होते. तर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.
आर्थिक सर्वे काय सांगतो
जर भारताला आपले उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर अगदी लहानपणापासून मुलांच्या लाइफस्टाइलकडे लक्ष द्यावे लागेल. याचबरोबर सध्या कार्यालयात जे वातावरण आहे तेही ठीक नाही. कामाचा प्रचंड ताण आणि एकाच जागेवर तासनतास बसून काम यांमुळे लोकांचे मानसिक आरोग्य खराब झाले आहे. याचा परिणाम देशाच्या प्रगतीवर होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
67 लाख 50 हजारांचे बक्कळ पॅकेज देणारी सरकारी नोकरीची जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स