Home Loan Pre Payment : होम लोनच्या मदतीने नव्या घराचं स्वप्न साकार करता येतं. पण कर्ज हे कर्जच असतं. एकदा घेतलं म्हणजे त्याचे हप्ते नियमितपणे भरण्याची जबाबदारी आपसूकच येते. जर कर्जाचा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर सीबील स्कोअर (CIBIL Score) खराब होतोच शिवाय बँकांच्या प्रतिनिधींचे फोन सुरू होतात. इतकेच नाही तर पेनल्टी चार्जेस सुद्धा भरावे लागतात. अशा वेळी कर्जाच्या या टेन्शनमधून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे प्री पेमेंट.
कर्जाची मुदत संपण्याआधीच कर्जाचे पैसे परत करणे याला प्री पेमेंट (Home Loan Pre Payment) म्हणतात. हा पर्याय कर्जधारकाकडे नेहमीच असतो. यामध्ये कर्जधरक कर्जाचा काही हिस्सा भरून टाकतो. यानंतर कर्जाचा हप्ता कमी होतो. कर्जाची रक्कम सुद्धा कमी होते. कर्जातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा हा एक मार्ग असल्याचे आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही देखील हा पर्याय घेण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात असू द्या की बँक यावर देखील ठराविक रक्कम आकारते. बँक किंवा वित्तीय संस्था किती शुल्क आकारतात याची माहिती जाणून घेऊ या..
होम लोन घेताय? मग, बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या अन् व्हा हुशार!
मुदतीआधी एखादा कर्जाधरक कर्ज परत करत असेल तर यात बँकेचे नुकसान असते. त्यामुळे बँक यावर चार्जेस आकारते. हे चार्जेस कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत आकारले जातात. जर एखाद्या व्यक्तीने 20 वर्षे मुदतीचे कर्ज घेतलं असेल आणि त्याने सुरुवातीच्या 3 ते 5 वर्षांतच प्री पेमेंटचा पर्याय घेतला तर बँक किंवा वित्तीय संस्थेकडून पेनल्टी लावली जाते. बँक त्यांच्या कॉस्टची भरपाई करण्याच्या उद्देशाने ही पेनल्टी लावते. काही बँका आणि वित्तीय संस्था मात्र असे कोणतेही चार्जेस कर्जदाराकडून वसूल करत नाही. अशा परिस्थितीत कर्ज घेतेवेळी प्री पेमेंटबाबत व्यवस्थित माहिती करून घेणे गरजेचे आहे.
1. प्री पेमेंटचा पर्याय घेण्याआधी कर्जाचा हप्ता आणि सेव्हींगचे व्यवस्थित कॅल्क्यूलेशन करून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पेनल्टी देत असाल ती रक्कम तुमच्या बचत केलेल्या पैशांच्या व्याजापेक्षा जास्त आहे किंवा नाही याचा नक्कीच विचार करा. यासाठी तुम्ही ऑनलाईन कॅल्क्युलेटरचा देखील वापर करू शकता.
2. तुम्ही जर प्री पेमेंटचा पर्याय घेतला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या सेव्हिंग आणि इमर्जन्सी फंडवर होणार नाही याची काळजी घ्या. जर याचा विचार तुम्ही केला नाही तर तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
3. जे पैसे तुम्ही प्री पेमेंट म्हणून देणार आहात ते पैसे अन्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ शकतील का याचाही नक्कीच विचार करा आणि त्यानुसार निर्णय घ्या.
मोठी बातमी! कर्जाचा हप्ता वाढणार नाही; आरबीआयकडून रेपो रेट पुन्हा जैसे थे