Corporate Health Insurance : आजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्य विमा खूप (Health Insurance) आवश्यक झाला आहे. या गोष्टीचं महत्त्व लक्षात आल्याने आता ऑफिस देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनी द्वारे दिल्या गेलेल्या इन्शुरन्सला कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स म्हंटले (Corporate Health Insurance) जाते. ज्या लोकांकडे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असतो त्यांच्याकडून पर्सनल हेल्थ इन्शुरन्स घेण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. जर ऑफिसकडून आरोग्य विमा काढला आहे तर आम्ही पुन्हा आरोग्य विमा का खरेदी करावा असे उत्तर या कर्मचऱ्यांकडून दिले जाते.
पण हे चुकीचे आहे. जरी तुमच्याकडे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असेल तरी सुद्धा तुम्ही पर्सनल हेल्थ इन्शुरन्स (Personal Health Insurance) घेतला पाहिजे. यामागे कारणही आहे. आर्थिक दृष्ट्या हे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊ या की कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स बरोबरच पर्सनल हेल्थ इन्शुरन्स घेणं का महत्वाचं आहे.
GST: जीएसटी परिषदेमध्ये विमा हप्त्यावरील टॅक्स कमी करण्यावर चर्चा; अजित पवारांची परिषदेला दांडी
आज अनेक गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांवर उपचार करण्यासाठी दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागते. दवाखान्यातील उपचारांचा खर्च, औषधांचा खर्च खूप जास्त असतो. हा खर्च प्रत्येकालाच शक्य होईल असे नाही. त्यामुळेच आरोग्य विमा असणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स पेक्षा पर्सनल हेल्थ इन्शुरन्स जास्त फायदेशीर ठरतो. कारण याचा सम अश्योर्ड कॉर्पोरेट इन्शुरन्स पेक्षा जास्त असतो.
काय, तुम्हाला अजूनही आभा कार्ड मिळालं नाही? घर बसल्या कसे मिळवाल कार्ड..
कॉर्पोरेट इन्शुरन्स मध्ये नो क्लेम बोनसचा (No Claim Bonus) फायदा मिळत नाही. जर एखादा कर्मचारी कॉर्पोरेट इन्शुरन्स बरोबरच पर्सनल हेल्थ इन्शुरन्स घेत असेल तर त्याला नो क्लेम बोनसचा फायदा मिळवता येतो. हा बोनस तुम्हाला पुढील विमा हप्ता (Insurance Premium) कमी करण्यास मदत करतो.
ज्यावेळी तुम्ही जॉब चेंज करता त्यावेळी कॉर्पोरेट इन्शुरन्स देखील बदलतो. अशा वेळी जर तुमच्याकडे पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला कवरेजची समस्या येत नाही. अनेक कंपन्या अनेक आजारांना एका वेळेनंतर कव्हर करतात. म्हणून आर्थिक तज्ज्ञ नेहमीच सल्ला देतात की जॉब बरोबरच तुमच्याकडे पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. पर्सनल हेल्थ इन्शुरन्स दरवर्षी नूतनीकरण करावा लागतो. याचा फायदा आयुष्यभर मिळत राहतो.
Insurance Fraud : 11 कोटींसाठी विद्यार्थ्याचं भयानक पाऊल; तब्बल 10 तास ड्राय आईसमध्ये ठेवले पाय
वैयक्तिक आणि कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स आर्थिक सुरक्षितता आणि जोखीमेच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असतो. पर्सनल हेल्थ इन्शुरन्स विमाधारक आणि त्याच्या कुटुंबाला आपत्कालीन जोखीमेपासून संरक्षण देतो. या व्यतिरिक्त मानसिक शांती आणि स्थिरता देखील निश्चित करतो. दुसरीकडे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स संभाव्य आर्थिक नुकसानीपासून विमा धारकाचे संरक्षण करतो. यामध्ये अशाही काही अटी असतात ज्यांच्याकडे कर्मचारी फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी खरी गरज असते त्यावेळी याच अटी आडव्या येतात आणि संबंधित कर्मचाऱ्याला विमा संरक्षण मिळू शकत नाही, असे एफपीएसबी इंडियाचे सीईओ श्रीकृष्ण मिश्रा यांनी सांगितले.