Car Insurance Add Ons : वाहन खरेदी केल्यानंतर विमा घेतला जातो. परंतु क्लेम केल्यानंतरही त्यांना पूर्ण (Car Insurance) परतावा मिळत नाही. बऱ्याच कार कंपन्यांकडून क्लेमच्या पैशांत कपात केली जाते त्यामुळे असे घडते. जर तुमच्या वाहनाची चोरी झाली असेल किंवा एखाद्या वेळी वाहन दुर्घटनाग्रस्त झाले असेल तर कंपनीकडून क्लेमचे पूर्ण पैसे मिळावेत असे तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. कारसोबत कार इन्शुरन्स खरेदी करत असाल तर या इन्शुरन्सबरोबर काही खास अॅड ऑन्स देखील (Insurance Cover) खरेदी करा. यामुळे तुमचे भविष्यातील आर्थिक नुकसानीची भरपाई मिळेल. चला तर मग अशाच तीन खास अॅड-ऑन्सची माहिती घेऊ या..
जर तुमच्या कारची चोरी झाली किंवा एखाद्या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत विमा कंपनी Insured Declared Value रक्कम तर देईलच शिवाय कारची ऑन रोड किंमतही देईल. नवीन कार खरेदीच्या तीन वर्षांपर्यंत हा कव्हर खरेदी करता येतो. त्यामुळे नवीन कार खरेदी केल्यानंतर सुरुवातीच्या वर्षांसाठी हा कव्हर घेतला पाहिजे.
वाहनातील सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे इंजिन. इंजिन जर खराब झाले तर दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. सामान्य पॉलिसीत हा खर्च कव्हर केला जात नाही. पण जर तुम्ही इंजिन प्रोटेक्शन कव्हर खरेदी केला असेल तर इंजिन दुरुस्ती किंवा इंजिन बदलण्यासाठी येणारा खर्च विमा कंपनी देईल. इंजिनमध्ये पाणी जाऊन जर नुकसान झाले असेल तर मात्र याचा फायदा या कव्हरमध्ये मिळत नाही.
वाहन म्हटल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च येणारच. वाहनांचे स्पेअर पार्ट खराब झाल्यावर बदलावे लागतात. जर तुमच्याकडे पॉलिसीसोबत झिरो डेप्रिसिएशन कव्हर असेल तर विमा कंपनीकडून स्पेअर पार्ट्सची किंमत मिळते. यामुळे कारमधील स्पेअर पार्ट्सची संपूर्ण रक्कम तुम्हाला मिळते. नवीन आणि जास्त किंमतीच्या वाहनांसाठी हा कव्हर जास्त फायदेशीर आहे.