CDAC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. ती म्हणजे, प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत (Center for Advanced Computer Development) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. या भरतीअंतर्गत व्यवस्थापक आणि प्रकल्प अभियंता (Project Engineer) या पदांच्या तब्बल 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.
चुकीच्या आहारामुळे भारतीयांना असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलं; ICMR-NIN ने जारी केला डाएट प्लॅन
एकूण पदे – 59 रिक्त पदे
पदाचे नाव – प्रोग्राम मॅनेजर, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता
पदांचा तपशील –
प्रोग्राम मॅनेजर पदासाठी एकूण दोन रिक्त पदांवर भरती केली जाईल.
प्रकल्प अभियंता पदासाठी एकूण 36 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी एकूण दोन रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदासाठी 19 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
सोशल मीडियावर हिरो, पण वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर ठरले झिरो; फॉलोवर्स गेले कुठे?
शैक्षणिक पात्रता-
सर्व पदांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार माहिती ही प्रत्येक नोकरीच्या अधिसूचनेत वाचावी.
वयोमर्यादा – 50 वर्ष
पगार-
प्रोग्राम मॅनेजर पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 17.52 लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाईल.
प्रकल्प अभियंता पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला प्रति वर्ष 7.86 ते 8.94 लाख रुपये वेतन दिले जाईल.
प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 17.52 लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाईल.
वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला प्रति वर्ष 9.65 ते 11.51 लाख रुपये वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पध्दत –
उमेदवारांना वरीलपैकी कोणत्याही पदासाठी नोकरीचा अर्ज करायचा असेल तर त्यांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख– 5 जून
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 जून 2024
प्रगत संगणक विकास केंद्र अधिकृत वेबसाइट –
https://www.cdac.in/
अधिसूचना –
https://careers.cdac.in/advt-details/ND-2952024-KDD5W
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांना प्रगत संगणक विकास केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागले. अर्ज भरतांना उमेदवारांनी योग्य आपली योग्य माहिती भरावी. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि आपला फोटो जोडाा. अर्ज करताना अचूक माहिती भरावी, चूकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमदेवारांनी नोंद घ्यावी. महत्वाचं म्हणजे, उमेदवारांनी
शेवटच्या तारखेपूर्वी नोकरीसाठी अर्ज भरणे अनिवार्य आहे.