Download App

ग्राहकांनो, 1 मे पासून ATM च्या नियमांमध्ये होणार बदल, द्यावे लागणार जास्त चार्ज; कारण काय?

New ATM Charges: येत्या दोन दिवसानंतर मे महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याचे पहिल्या दिवशीच देशात काही नियम बदलणार आहे.

  • Written By: Last Updated:

New ATM Charges: येत्या दोन दिवसानंतर मे महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याचे पहिल्या दिवशीच देशात काही नियम बदलणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. त्यापैकी सर्वात महत्वाचे नियम म्हणजे एटीएमबाबत आहे. देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI)  देशभरातील एटीएम व्यवहार शुल्कासाठी 1 मेपासून नवीन नियम (New ATM Charges) लागू करणार आहे. या नियमांनुसार, फ्रीमध्ये एटीएममध्ये मर्यादेपेक्षा व्यवहार केला तर आता जास्त शुल्क मोजावे लागणार आहे.

तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, पीएनबी, कोटक महिंद्रा इत्यादी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी नवीन शुल्कांबद्दल आधीच माहिती दिली आहे. तुमच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये तुम्ही किती वेळा फ्रीमध्ये सर्विस घेऊ शकतो याची माहिती आरबीआयने दिली आहे.

मोफत व्यवहारांची मर्यादा कुठे किती ?

महानगरांमधील ग्राहकांना महिन्याला तीन मोफत व्यवहारांचा लाभ घेता येईल. महानगराबाहेरील भागात, दरमहा पाच मोफत व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या मुक्त मर्यादा आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांना लागू होतात.

 किती अतिरिक्त शुल्क आकारले जाईल?

मासिक मोफत व्यवहार मर्यादा ओलांडल्यास बँकांना प्रति व्यवहार जास्तीत जास्त 23 रुपये आकारण्याची परवानगी असेल. ही मर्यादा आर्थिक आणि गैर-पैसे व्यवहारांना लागू आहे. तर कर देखील वेगळा आकारला जाईल. हे नवीन शुल्क केवळ एटीएम व्यवहारांवरच लागू नाहीत, तर कॅश रिसायकलर मशीन्स (सीआरएम) मध्ये केलेल्या व्यवहारांवर देखील लागू असणार आहे.

बँकेचे नवीन एटीएम शुल्क

एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, मोफत व्यवहार मर्यादेनंतर, 1 मे 2025 पासून, प्रत्येक एटीएम व्यवहारावर 23 रुपये + कर आकारला जाईल, तर आतापर्यंत हा शुल्क 21 रुपये + कर होता.  एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील व्यवहारांसाठी, फक्त रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांवरच शुल्क आकारले जाईल. कॅशलेस व्यवहार (बॅलन्स चौकशी, मिनी स्टेटमेंट आणि पिन बदल) मोफत असतील.

भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला; लष्कर अलर्ट मोडवर

तर पीएनबी वेबसाइटनुसार, इतर बँकांच्या एटीएममधील मोफत व्यवहारांव्यतिरिक्त, 09.05.2025 पासून रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांवर 23 रुपये आणि रोख नसलेल्या व्यवहारांवर 11 रुपये (जीएसटी वगळून) शुल्क आकारले जाईल.

follow us