Smoking Side Effects : धूम्रपान करणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. तरी देखील लोक या गोष्टीचा विचार न करता सिगारेट ओढत (Smoking) असतात. धूम्रपानामुळे अनेक आजारांचा शरीरात शिरकाव होण्याचा धोका असतो. सिगारेटचा धूर फुफ्फुसांचे मोठे नुकसान करतो. तसेच हृदयविकाराचा धोका (Heart Disease) देखील वाढवतो. शरीरासाठी अपायकारक आहे याची जाणीव असतानाही सिगारेट शौकीन काही सिगारेटचा मोह सोडू शकत नाहीत.
सिगारेटमध्ये तंबाखू असते आणि याचा धूर शरीरातील अवयवांना नुकसानकारक ठरतो. धूम्रपान करणारे लोक इतक्या आजारांचे बळी ठरू शकतात ज्याची कल्पना करता येणार नाही. WHO वर विश्वास ठेवला (World Health Organization) तर दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू स्मोकिंगमुळे होतो. एकट्या अमेरिकेतच स्मोकिंगमुळे तब्बल 5 लाख लोकांचा मृत्यू होतो.
युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या रिपोर्टनुसार धूम्रपानामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाचे नुकसान होते. सिगारेटचा धूर फुफ्फुस आणि हृदयाला आजारी पाडतोच शिवाय संपूर्ण शरीरावर याचा अतिशय घातक परिणाम होतो. जे लोक दररोज अनेक सिगारेट पितात त्यांच्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी होत जाते. तसेच अनेक घातक आजारांना आमंत्रण मिळते. सिगारेट पिल्यामुळे कॅन्सर, हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
वेळीच सावध व्हा! झोपण्याआधी मोबाईल पाहणे येवू शकते अंगलट, ‘या’ गंभीर समस्यांची शक्यता
सिगारेटमध्ये निकोटिन, टार सारखे घातक केमिकल असतात. यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होते. शरीरातील सामान्य घडामोडी देखील प्रभावित होतात. हेल्थ एक्स्पर्टनुसार सिगारेटचा धूर फुफ्फुसांचे सर्वाधिक नुकसान करतो. यामुळे क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पलमोनरी डिसिज आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका वाढतो. या आजारांमुळे श्वास घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. इतकेच नाही तर स्मोकिंगमुळे मधुमेहाचाही (Diabetes) धोका वाढतो.
स्मोकींग केल्यामुळे शरीरात इन्सुलिनचा परिणाम कमी होऊ शकतो. असे झाले तर स्मोकिंग करणारा व्यक्ती टाइप 2 डायबिटीजचा रुग्ण होऊ शकतो. स्मोकिंगमुळे शरीराची इम्युनिटी सिस्टीम कमकुवत होऊ शकते. डोळ्यांचे आजार वाढीस लागण्याची शक्यता असते. तसेच स्मोकिंगमुळे रूमेटॉइड आर्थरायटीससारखे ऑटोइम्यून आजार होऊ शकतात. या सर्व कारणांमुळे लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि लोक वयाच्या आधीच वृद्ध दिसू लागतात. इतके नुकसान धुम्रपानामुळे होते. त्यामुळे धूम्रपान टाळा आणि निरोगी राहा.
कॅन्सरपासून हृदयापर्यंत आजारांचा धोका, धूम्रपान टाळा; जाणून घ्या तंबाखू विरोधी दिनाचं महत्व..
आजच्या जमान्यात ई सिगारेट, हुक्का आणि गांजा या पदार्थाचे सेवन वाढत चालले आहे. ई सिगारेट मध्ये सुद्धा निकोटिन असते. ज्यामुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. आजकाल सेकेंड हॅण्ड स्मोकिंगचा धोका वाढत चालला आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतोच शिवाय त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही सिगारेटच्या धुराचा त्रास होतो. तंबाखू असलेला कोणताही पदार्थ कॅन्सर सारख्या घातक आजाराला निमंत्रण ठरू शकतो.