Download App

तुम्ही 1 तासापेक्षा जास्त वेळ मोबाईलला चिकटून राहता का? होवू शकतो गंभीर आजार, जवळचंही दिसणं होईल कठीण

Daily Screen Time Can Increase Risk Of Myopia : जर तुम्हाला तुमच्या मोबाईलला चिकटून राहण्याची सवय असेल तर (Risk Of Myopia) सावधगिरी बाळगा. कारण अलीकडील एका संशोधनात असा दावा करण्यात आलाय की, जर तुम्हाला 1 तास डिजिटल स्क्रीनला चिकटून राहण्याची सवय असेल तर त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. हा डोळ्यांचा (Eye Disease) एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये जवळच्या वस्तू दिसत (Health Tips) नाहीत.

दिवसेंदिवस फोन, संगणक यामध्ये आपला खूप वेळ जातोय. आजच्या काळात, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण टीव्ही, फोन, टॅबलेट वापरत आहेत. त्याचा डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. टीव्ही, फोन, लॅपटॉप, टॅबलेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. एका अभ्यासातून असं दिसून आलंय की, दररोज किमान एक तास टॅब्लेट किंवा स्मार्टफोनवर घालवल्याने मायोपिया किंवा दूरदृष्टीचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

किवींची थेट फायनलमध्ये धडक; दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव

अभ्यासानुसार, डिजिटल स्क्रीन वेळेत दररोज 1 तास वाढ केल्याने मायोपियाचा धोका 21 टक्के वाढतो. संशोधनानुसार, डिजिटल स्क्रीन वेळेत दररोज 1 तास वाढ झाल्याने मायोपियाचा धोका 21 टक्के वाढतो. संशोधकांनी सांगितले की, 1 ते 4 तास स्क्रीनवर घालवल्याने मायोपियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आणि नंतर हळूहळू तो आणखी वाढत गेला.

मायोपिया ही डोळ्यांची एक समस्या आहे. ज्यामध्ये जवळची दृष्टी चांगली असते, परंतु दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. मुलांमध्ये ही सर्वात सामान्य आहे. सामान्यतः 6 ते 12 वर्षे वयोगटातील विकसित होते. हे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सने दुरुस्त करता येते. मायोपिया जितक्या लहान वयात सुरू होते तितकेच ते अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. दूरची दृष्टी कमकुवत, डोळ्यांवर ताण आणि थकवा, डोळ्यांना पाणी येणे, वारंवार डोळे मिचकावणे, डोकेदुखी ही मायोपियाची लक्षणे आहेत.

‘…तर कोणालाही सोडू नका, धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा’; लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

भारतातील तज्ञांनी परीक्षेच्या काळात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी तंत्रज्ञान आणि मोबाईलसारखे गॅझेट कसे एक मोठी समस्या बनले असल्याचं सांगितलं आहे. जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने मेंदूच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे एकाग्रता कमी होते आणि लोक बऱ्याचदा बेडवर किंवा सोफ्यावर चुकीच्या पद्धतीने बसून स्क्रीनकडे बराच वेळ पाहत राहतात. यामुळे लठ्ठपणा, शरीरदुखी, पाठीच्या कण्यातील समस्या आणि पाठदुखी यासारख्या विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असं देखील अभ्यासात समोर येत आहे.

 

follow us