किवींची थेट फायनलमध्ये धडक; दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव

किवींची थेट फायनलमध्ये धडक; दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव

South Africa vs New Zealand Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका (South Africa) 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. षटकांत संघाने गडी गमावून धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलरची नाबाद 100 धावांची शतकीय खेळी तसेच एडन मार्करमने 31 धावा, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन ६९ धावा आणि कर्णधार टेम्बा बावुमा याने 56 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडसाठी (New Zealand) कर्णधार मिचेल सैंटनर याने 3 विकेट्स घेतल्या आणि मॅट हेन्री व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 2- 2 विकेट्स आपल्या नावी केल्या आहेत.

‘…तर कोणालाही सोडू नका, धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा’; लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला (Cricket News) आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने आफ्रिकेसमोर ३६३ धावांचा डोंगर उभा केला होता. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी ५० षटकांत ६ विकेट्स गमावून 362 धावा केल्या. ही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ऑस्ट्रेलियन संघाने त्याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध 356 धावा केल्या होत्या.

‘…तर कोणालाही सोडू नका, धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा’; लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रचिन रवींद्र (108) आणि केन विल्यमसन (102) यांनी जोरदार शतके लगावली, तर ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल प्रत्येकी 49-49 धावांवर बाद झाले. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 3 विकेट्स घेतल्या.तर रबाडानेही 2 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 9 मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारतासोबत भिडणार आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बवुमा (कर्णधार), ऐडन मार्कराम, रायन रिकेल्टन, रासी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वेन मुल्डर, मार्को यानसन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी.’

न्यूझीलंड: मिशेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरूर्क.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube