VIDEO : सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांचं राक्षसी कृत्य, बॅटनेच अमानुष मारहाण; बीडमधली आणखी एक भयंकर घटना समोर

VIDEO : सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांचं राक्षसी कृत्य, बॅटनेच अमानुष मारहाण; बीडमधली आणखी एक भयंकर घटना समोर

Beed Crime News Person Beaten In Shirur Video Viral : बीडमध्ये (Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून ताजंच आहे. देशमुखांच्या हत्येचे फोटो (Suresh Dhas) संपूर्ण राज्याने पाहिलेय, हे घाव ताजेच असताना पुन्हा एक अमानुष घटना बीडमधून समोर आलीय. बीड जिल्ह्यातील एक व्हिडिओ वेगात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे, तो व्यक्ती आरडाओरडा करताना दिसत आहे. ही घटना शिरूर तालुक्यात तीन महिन्यांपूर्वी घडली होती, असं सांगितलं जातंय.

जालन्यात दलित तरुणाला क्रूर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न; शिंदेंकडून आरोपींवर कडक कारवाईचा आदेश

गुन्हेगारी हा शब्द बीडकरांसाठी नवीन नाही. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय. बीडमध्ये चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड, लुटमारीसारख्या घटना सुरूच असल्याचं समोर (Beed Crime) येतंय. यामुळे बीड जिल्ह्यात सामान्य नागरिकांमध्ये मोठं दहशतीचं वातावरण आहे. अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओत तीन-चार लोक मिळून एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत, हे लोक भाजप अन् सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातंय.

बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडीओ शिरूर तालुक्यातील असल्याचे सांगितलं जातंय. या व्हिडिओमध्ये कुख्यात गुंड सतीश भोसले एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतंय. संबंधित व्यक्तीला अतिशय निर्घृणपणे मारहाण करत (Beed News) असल्याचं दिसत आहे. यावर आता समाजसेविका अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

दमानिया यांनी म्हटलंय की, मी एसपी श्री नवनीत कावत ह्यांच्याशी बोलले. त्यांनी सांगितले की, हा वीडियो जुना आहे. FIR झाली नाही, कारण कोणी कंप्लेंट केली नाही. आज ते Suo Moto कंप्लेंट घेत आहेत. तत्काळ कारवाई करतील. यासोबतच अंजली दमानिया यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर त्यांनी म्हटलंय की, हे काय आहे?

गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडियो पाहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली का? CM फडणवीस म्हणाले, ‘हे काम अतिशय…’

या मारहाणीमध्ये संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याचं सांगितलंय जातंय. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव सतीश भोसले असून त्याची पोलिसांसोबतच संबंध असल्याचं देखील सांगितलं जातंय. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचं सत्र थांबतंच नसल्याचं दिसतंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube