‘…तर कोणालाही सोडू नका, धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा’; लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

‘…तर कोणालाही सोडू नका, धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा’; लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

Laxman Hake : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) मुख्य आरोपी करण्यात आलं. चार्जशीट दाखल केल्यानंतर दोन दिवसांत प्रकृतीचे कारण देत मुंडेंनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुंडेंना या हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) केली. तर आता आता संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake)घेतली.

VIDEO : सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांचं राक्षसी कृत्य, बॅटनेच अमानुष मारहाण; बीडमधला आणखी एक भयंकर घटना समोर 

मुंडेंनाही सहआरोपी करा…
लक्ष्मण हाकेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना हाकेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी पेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. किंबहुना पुरावा असेल तर निश्चितच कोणालाही सोडू नका, सहआरोपी करा, अशी आमची भूमिका असल्याचं हाके यांनी म्हटलं. जर धनंजय मुंडेंविरोधात पुरावे असतील तर त्यांना देखील सहआरोपी करा. मात्र, पुरावे नसताना मीडिया ट्रायल करून कोणाला आरोपी करता येत नाही, त्यासाठी त्यांचे पुरावे सापडावे लागतात आणि एफआयआरमध्ये नाव असावं लागंत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचा दावा हाकेंनी केला.

मुंडेंच्या राजीमाम्यासाठी आम्ही आंदोलन केले असते…
हाकेंनी मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ज्या पद्धतीने देशमुखांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे फोटो जर आधी पाहायला मिळाले असते तर यापूर्वीचं त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही मोठं आंदोलन केलं असते, असं हाके म्हणाले.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आधीच माहित असतील तर त्यांनी त्यांचा राजीनामा अगोदर घ्यायला पाहिजे होता, अशी टीकाही हाकेंनी केली.

हमाम में सब नंगे होते है- लक्ष्मण हाके
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची मागणी केली. यावर बोलताना हाके म्हणाले की, हमान में सब नंगे होते है, जर जयकुमार गोरे यांचा राजीनामा मागत असतील तर २८८ आमदारांत एकही आमदार राहू शकणार नाही, असं हाके म्हणाले. आमदारकी आणि त्यातून पैसा ही पद्धत सुरू असून यातला कोणता आमदार खांदायला गेला होता का? अशा शब्दात गोरेंचे समर्थन करताना न्यायालयासमोर माफी मागून त्यांनी निर्दोष सोडले असेल तर पुन्हा त्यांचा राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं असल्याचं हाके म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube