Download App

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू, महिन्याला मिळणार 42 हजार रुपये वेतन

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (Defense Institute of Advanced Tech. ) पुणे यांनी रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली,

DIAT Pune Bharti 2024 : आज अनेकजण नोकरीच्या (Govt Job) शोधात आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. ती म्हणजे, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (Defense Institute of Advanced Technology) पुणे यांनी विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, याच भरती प्रक्रियेविषयी जाणून घेऊ.

मोदी-शहांबरोबरील गप्पात काय चर्चा? डोर्लेवाडीतील सभेत अजितदादांनी टाकला हुकूमी पत्ता 

विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊन https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाइटवर आपले अर्ज पाठवावे. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख १५ मे आहे.

रिक्त जागा आणि पदांची संख्या –
ज्युनियर रिसर्च फेलो (SRF) – ३ पदे आणि सिनियर रिसर्च फेलो (SRF) – २ पदे. म्हणजेच एकूण दोन रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातेय.

शैक्षणिक पात्रता –
दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे B.E./B.Tech आणि प्रथम श्रेणी NET/GATE उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अथवा किंवा M.E./M.Tech प्रथम श्रेणी पदवी असावी.

Malavika Mohanan अभिनेत्री मालविका मोहननचे खास फोटो 

भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2024 आहे. याआधी तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महत्वाचं म्हणजे, चुकीची माहिती असलेले किंवा अर्धवट माहिती असलेले अर्ज नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पगार –
या भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतर, ज्युनियर रिसर्च फेलो उमेदवाराला 37 हजार रुपये वेतन मिळेल; तर सिनियर रिसर्च फेलो उमेदवारांना 42 हजार रुपये वेतन दिले जाईल.

वयोमर्यादा-
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षे असावे.

अर्ज कसा पाठवायचा?
उमेदवारांनी त्यांचे अर्ज brazilraj.a@diat.ac.in या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत.

अधिसूचना –

https://drive.google.com/file/d/1u-NrWypMFJ8ljoQuC-4qsqBCVld08zt6/view

आवश्यक कागदपत्रे –
दहावी परीक्षेची गुणपत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेनुसार विविध प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला आवश्यक आहे.

follow us