मोदी-शहांबरोबरील गप्पात काय चर्चा? डोर्लेवाडीतील सभेत अजितदादांनी टाकला हुकूमी पत्ता

मोदी-शहांबरोबरील गप्पात काय चर्चा? डोर्लेवाडीतील सभेत अजितदादांनी टाकला हुकूमी पत्ता

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. अजितदादांनी तर मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी प्रचाराच्या सभा होत आहेत. आज सकाळी त्यांची सभा बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे झाली. या सभेत त्यांनी केलेलं एक वक्तव्य खास चर्चेत राहिलं आहे. मी पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी आणि अमि शहा यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. खरंतर मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे हे मी त्यांना सांगतिलं, असे अजित पवार या सभेत म्हणाले.

रोहित पवारांना धक्का! कट्टर समर्थक अजितदादांच्या राष्ट्रवादीत; बारामतीचं गणित बिघडणार?

अजित पवार पुढे म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. हे चित्र मी बदलून दाखवू शकतो. फक्त तुम्ही भावनिक होऊ नका. आपल्या समस्या कोण सोडवू शकेल याचा विचार करा. मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे माझी अनेक लोकांबरोबर ओळख झाली. तुम्ही पाहिलं असेल मी पुण्यातील सभेत मोदी शहांबरोबर कशा गप्पा मारत होतो. खरंतर मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे हे मी त्यांना सांगतिलं.

मला शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा आहे. नाहीतर पुढील पिढी मला माफ करणार नाही. अजित पवारने सत्तेत राहून काय केलं? असा प्रश्न ते विचारतील. त्यामळे या निवडणुकीत भावनिक होऊ नका, असेआवाहन अजित पवार यांनी या सभेत उपस्थितांना केले. यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी मनोगत व्यक्त केले.

महादेव जानकरांचा पुतण्याही लोकसभेच्या रिंगणात, स्वरूप जानकरांचा माढ्यातून अर्ज

महादेव जानकर यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. उद्धव साहेब तुमचं डिपॉझिट कसं राहिल तेच बघतो असे आव्हान जानकरांनी दिले. जानकर पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींशी माझी चांगली ओळख आहे. मी परभणीला निधी देणार. बारामतीलाही निधी देणार. अजित पवार भाबडा माणूस आहे. ते उद्याचे विकासपुरुष आहेत अशा शब्दांत महादेव जानकरांनी अजित पवारांचं कौतुक केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube