Download App

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, महिन्याला 42 हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:

DIAT Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकऱ्य (Government jobs) शोधत असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाटी आहे. विशेष म्हणजे, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे चालून आली. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (Defense Institute of Advanced Technology) पुणे यांनी विविध विभागांमधील अनेक रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण 7 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल) अर्ज करावा लागेल. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी २०२४ आहे. या भरतीसाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी निर्धारित कालावधीत आणि शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.

Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेशात ‘भाजप’ की ‘इंडिया’; सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर 

भरती तपशील:

संस्था: डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणे

एकूण रिक्त जागा: 07 पदे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी: brazilraj.a@diat.ac.in

जागांचा तपशील :

1. ज्युनिअर रिसर्च फेलो: 03 पदे

2. वरिष्ठ संशोधन फेलो: 03 पदे

3. प्रकल्प सहाय्यक: 01 जागा

Savani Ravindra : सिम्पल पण क्लासी; काळ्या रंगाच्या साडीत खुललं सावनीचं सौदंर्य 

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता:

1. ज्युनिअर रिसर्च फेलो : B.E. किंवा बी. टेक प्रथम श्रेणीसह NET/GATE किंवा प्रथम श्रेणीत M.E. किंवा एम टेक.

2. सीनियर रिसर्च फेलो: B.E. किंवा बी. टेक प्रथम श्रेणीसह NET/GATE किंवा प्रथम श्रेणीत एम.ई किंवा एम. टेक.

3. प्रकल्प सहाय्यक: B.Sc/M.Sc/डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा B.A. किंवा M.A. (इंग्रजी), इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान, इंग्रजीमध्ये चांगले लेखन आणि बोलण्याचे कौशल्य.

वय श्रेणी :

1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 फेब्रुवारी 2024 रोजी 28 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल.
तर, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट दिली जाईल.

पगार :

1. ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी: 37 हजार ते 42 हजार रुपये प्रति महिना

2. सिनियर रिसर्च फेलोच्या पदासाठी: 42 हजार रुपये दरमहा

3. प्रकल्प सहाय्यक पदासाठी: दरमहा 20 हजार रुपये पर्यंत

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी ईमेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळं उमेदवारांनी तातडीने या भरतीसाठी अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. शिवाय, अपुरी माहिती असलेले अर्जही नाकारले जातील, याची उमदेवारांनी नोंद घ्यावी.

follow us