Download App

DRDO मध्ये विविध पदांची भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार अर्ज

  • Written By: Last Updated:

DRDO Recruitment 2024: आज अनेक उमदेवार हे चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, आज स्पर्धा इतकी आहे की, सरकारी नोकरी (Job) मिळवणं हे उमेदवारांसमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही  सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, डीआरडीओमध्ये अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (DRDO-Defence Research & Development Organisation) ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (Graduate Apprentice Trainee) आणि डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी (Diploma Apprentice Trainee) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या मोहिमेअंतर्गत एकूण 88 पदांची भरती करण्यात येणार आहे. दरम्यान, याच पदभरतीविषयी जाणून घेऊ.

ठाकरे-पवारांचं रौद्र रूप! लोकसभेपूर्वीच ‘दोन जखमी वाघांची’ डरकाळी; अनेकांना धसका 

इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. र्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2024 आहे. पात्र उमेदवारांचे वय १८ वर्षे असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावे लागणार आहेत.

शैक्षणिक पात्रता
ग्रॅज्यूएट ट्रेनी पदासाठी पात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानविषयीतील पदवी घेतलेली असावी. महत्वाचं म्हणजे, उमेदवार किमान प्रथम श्रेणीने उतीर्ण असावा.

Madgaon Express सिनेमातील नोराचा ‘बेबी ब्रिन्ग इट ऑन’ गाण्याचे टीझर रिलीज 

डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी उमदेवाराने राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाने मंजूर केलेल्या संस्थेमधून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लाोमा घेतलेला असावा. उमदेवाराने किमान प्रथम श्रेणीत डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

अधिकृत वेबसाइट – https://www.drdo.gov.in/

DRDO ASL भरती अधिकृत अधिसूचना –
https://www.drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtApprASL21022024.pdf

पगार
निवडलेल्या उमेदवाराला पदानुसार वेतन मिळेल.
पदवीधर अप्रेंटिस – रु. 9000/-
तंत्रज्ञ अप्रेंटिस – रु.8000/-
ट्रेड अप्रेंटिस- रु. 7000/-

अर्ज कसा करू शकता?
पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. उमदेवारांना या भरतीसाठी अर्ज हा संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पीओ, हैदराबाद-५००५८

follow us