Eat this super food to prevent heat-related illnesses in summer : फेब्रुवारी महिना संपताच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे वातावरण बदलाने होणारे आजार त्याचबरोबर उष्णतेमुळे होणारे आजार डोके वर काढताना दिसत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी तसेच शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही सुपरफुड तुमच्या आहारात असणं अत्यंत गरजेचे आहे. कोणते आहेत हे सुपर फूड जाणून घेऊ…
उतेकरांनी माफी मागितलीच नाही, ‘त्या’ व्हायरल क्लिपवर शिर्के स्पष्टच बोलले…
नारळ पाणी –
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनच्या समस्या वाढतात तसेच शरीराला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी पिणे गरजेचे असते. या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीर थंड आणि आरोग्यदायी राहते.
‘दम लगाके हईशा’च्या प्रदर्शना आधी मी अनेक रात्री जागाच होतो! आयुष्मानने दिला आठवणींना उजाळा
दही –
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर सुदृढ ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे अत्यंत योग्य आहे हेच दही तुम्ही लस्सी किंवा ताक या स्वरूपात देखील सेवन करू शकता दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतं जे आरोग्यासाठी अत्यंत चांगलं मानलं जातं तसेच दही खाल्ल्याने पचन संस्था देखील मजबूत बनते.
वाल्मिक कराडांनी सुरेश धसांना निवडणुकीत पैसे दिले; बाळासाहेब आजबेंचा मोठा दावा
कलिंगड किंवा टरबूज –
कोणत्याही ऋतूमध्ये येणारे फळं हे त्या त्या ऋतूमध्ये आरोग्यास योग्य असतात. त्यामुळे उन्हाळ्यात येणारे टरबूज किंवा ज्याला कलिंगड म्हटलं जातं याचं सेवन करणे लाभदायी ठरते. यामुळे शरीर हायड्रेट आणि थंड राहतं.
गुन्हेगारीवर गृहखात्याचा अंकुशच नाही…, पुणे प्रकरणावरून लंकेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
लिंबू –
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे सरबतं केली जातात. ज्यामध्ये लिंबू सरबत आघाडीवर असतं. कारण लिंबाच्या सेवनाने शरीरातील विटामिन सी ची कमतरता दूर होते. शरीराचे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
काकडी –
टरबूजाप्रमाणेच काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी खाणं हा पर्याय देखील अत्यंत योग्य आहे. तसेच यामुळे शरीर थंड राहतं. तुम्ही काकडीच्या फोडी किंवा सॅलड, कोशिंबीर किंवा ज्यूस करूनही पिऊ शकता.