वाल्मिक कराडांनी सुरेश धसांना निवडणुकीत पैसे दिले; बाळासाहेब आजबेंचा मोठा दावा

वाल्मिक कराडांनी सुरेश धसांना निवडणुकीत पैसे दिले; बाळासाहेब आजबेंचा मोठा दावा

Valmik Karad gave money to Suresh Dhas in elections; Balasaheb Ajbe’s big claim : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना निशाणा केलं आहे. त्यात आता धसांचे विरोधी उमेदवार आणि अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज पत्रकार परिषद घेत सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांचे संबंध असून त्यांनी धसांना निवडणुकीसाठी पैसे दिल्याचा आरोप केला आहे.

उबाठाला पुन्हा एकदा ‘दे धक्का’; कोल्हापूरमध्ये सुजित मिणचेकरांचा शिवसेनेत प्रवेश

यावेळी बोलताना आजबे म्हणाले की, धस यांचा मतदारसंघ असलेल्या आष्टीमध्ये विकास कामे थांबवले आहेत.एमआरइजीएसचे पंधरा कोटी वितरीत केले गेले नाहीत.हे सर्व आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरून होत आहे. या बाबत जिल्हाधिकारी आणि सीइओ यांना निवेदन दिले आहे.गद्दाफी जसे हुकुमशहा वागत होते तसे आमदार धस वागत आहेत. ठराविक ग्राम पंचायतची कामे अडवली जात आहेत.मी धस यांना सात वेळेस फोन केले. ज्या लोकावर अन्याय झाला ते लोक मी समोर आणणार आहे.

अनेक वकील इंद्रजित सावंत यांच्याबरोबर…, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचा इशारा नेमका कोणाला?

अनेकांच्या जमिनी हडप केल्या आहेत. ते सगळे मी समोर आणणार आहे.देवस्थान जमिनीचे १७ प्रकार आहेत. एका महिलेला अडचणीत आणले आहे. त्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनेक देवस्थानचे जमिनी नातेवाईक आणि कार्यकर्ते यांच्या नावावर केले. देवस्थानच्या ट्रस्टवर हे बेकायदा गेले आहे.

आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल आहे. आष्टी मतदार संघात काय चालले आहे ते बघा. आकाचे आणि धस यांचे लागेबांधे तपासा. आताच्या निवडणुकीत वाल्मिक कराड यांनी सुरेश धस यांचे काम केले.मी याबाबत अजित पवार यांना सांगितले आहे. असा मोठा दावा आजबे यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube