उतेकरांनी माफी मागितलीच नाही, ‘त्या’ व्हायरल क्लिपवर शिर्के स्पष्टच बोलले…

Bhushan Shirke On Laxman Utekar : ‘छावा’ चित्रपट (Chhawa Movie) छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आलाय. या चित्रपटात संभाजी महाराजांना कैद करून देण्यात कोणी मदत केली, हे दाखवण्यात आलंय. मात्र, राजेशिर्के कुटुंबाने ‘छावा’ (Chhawa) सिनेमावर आक्षेप घेतला आहे. शिर्के कुटुंबियांच्या आक्षेपानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी (Laxman Utekar) शिर्के कुटुंबीयांची माफी मागितली अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. मात्र, उतेकरांनी माफी मागितलीच नाही, असं भूषण शिर्केंनी (Bhushan Shirke) सांगितलं.
गुन्हेगारीवर गृहखात्याचा अंकुशच नाही…, पुणे प्रकरणावरून लंकेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
शिर्के कुटुंबियांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी भूषण शिर्केंना उतेकर आणि शिर्के यांच्या माफीच्या संभाषणाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल विचारले असता ते म्हणाले की, उतेकरांकडून आम्हाला माफीचा फोन आला नव्हता. मात्र, मी त्यांना संपर्क कऱण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, उतेकरांनी फोनला उत्तर दिलं नाही. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने मीच त्यांना व्हाटसअपवर मेसेज केला की, चित्रपटात प्रदशित होण्याआधीच आम्ही आपल्याला नोटीस पाठवलीय. या चित्रपटात वादग्रस्त भाग असल्याचं समजले असून तो वादग्रस्त भाग आम्हाला दाखवण्यात यावा आणि हा वादग्रस्त भाग काढण्यात यावा, अशी मागणी केली. तर उतेकरांनी माझ्या व्हाईसचा रेफरन्स घेऊन माझ्याकडून कळत नकळत भावना दुखवल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं.
उबाठाला पुन्हा एकदा ‘दे धक्का’; कोल्हापूरमध्ये सुजित मिणचेकरांचा शिवसेनेत प्रवेश
पुढं ते म्हणाले, चित्रपटातील वादग्रस्त भाग खरा असेल तर उतकेरांनी तसे पुरावे द्यायला पाहिजेत. पण, उतेकर कुठलेच पुरावे देत नाहीत, असं शिर्के म्हणाले. आमचं उदयनराजे भोसलेंशी बोलणं झालं, ते उतेकरांना फोन करतील. आम्ही उदयनराजेंच्या माध्यमातून उतेकरांना चित्रपटातील वादग्रस्त भाग काढायला लावू, असंही शिर्के म्हणाले.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
उतेकर आणि भूषण शिर्के यांच्यातील भाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये उतेकर म्हणाले, भूषणजी, मी तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि तुमचा मेसेजही वाचला. तुमच्या मेसेजला प्रामाणिकपणे उत्तर देऊ इच्छितो. गणोजी आणि कान्होजी या एकल नावानेच फक्त चित्रपटात त्यांचा उल्लेख केलाय. त्यांचे आडनाव काय आहे, हे आपण अजिबात दाखवलं नाही, त्यांचे गावं कोणतं? हेही दाखवलं नाही. मी निश्चितच ती खबरदारी घेतली, चित्रपटातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही, कळत -नकळत तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं शिर्के म्हणाले.