राज ठाकरेंचा सल्ला… आक्षेप असलेले दृश्य काढून टाकणार, ‘छावा’च्या दिग्दर्शकांनी केलं स्पष्ट

राज ठाकरेंचा सल्ला… आक्षेप असलेले दृश्य काढून टाकणार, ‘छावा’च्या दिग्दर्शकांनी केलं स्पष्ट

Laxman Utekar Reaction After meets Raj Thackeray : अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या ‘छावा’ (Chhava Film) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटातील दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घेतल्याचे समोर आलंय. त्याच पार्श्वभूमीवर आज छावा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. आक्षेप असलेले दृश्य सिनेमातून काढून टाकले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

राज ठाकरेंचा सल्ला हवा होता. कारण त्यांचं वाचन खूप आहे. इतिहास चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. महाराजांवरती त्यांचं खूप वाचन आहे. त्यामुळे सिनेमांत नेमके काय बदल करायला हवेत, हे जाणून घेतलं. या चर्चेतून त्यांनी मला काही सुचना केल्यात. त्या खूप महत्वाच्या आणि चांगल्या सूचना आहेत. खूप छान प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलंय. त्याबद्दल राज साहेबांचे खूप खूप धन्यवाद, असं राज ठाकरे यांच्या भेटीनंतर छावाचे दिग्दर्शक म्हटले आहेत.

‘लाडक्या बहि‍णीं’मुळे तिजोरीत खडखडाट, सरकारचं मोठं नुकसान; SBI नं दिला गंभीर इशारा

सिनेमातील काही दृश्य डिलिट होणार का? यावर बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले की, सिनेमात दाखवण्यात आलेला लेझीम डान्सचा सिन डिलिट करणार आहोत. राज साहेबांनी देखील तोच सल्ला दिलाय. यामधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण यामुळे जर कोणाच्या अप्रत्यक्षरित्या भावना दुखावत असतील तर राजे अशा प्रकारे नाचत नसतील तर ते काढून टाकणार आहोत. कारण तो चित्रपटातील एक छोटासा भाग आहे. त्यामुळे आम्ही नक्की तो काढून टाकणार आहेत.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत कलगीतुरा; गोगावले म्हणाले, कुणी अंगावर आल तर त्याला..

हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून राजेंचा इतिहास जगाला कळणार आहे. त्यामुळे काही इतिहासकारांसोबत चर्चा करणार आहोत. स्क्रिनिंगला बोलावणार आहोत. गेली चार वर्षी आमची टीम यावर काम करत आहे. सिनेमातील आक्षेप असलेले दृश्य काढून टाकणार आहोत. हा सिनेमा बनवण्यामागे फक्त छत्रपती संभाजीराजे जगाला कळावेत, ते किती महान योद्धा होते याची जाणी होती, म्हणून हा सिनेमा बनवला आहे. परंतु एक-दोन गोष्टी जर या सिनेमाला गालबोल लावत असतील, तर त्या काढून टाकल्या जातील.

शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे. त्यांची ऑफिशिअल राइट्स घेवून हा चित्रपट बनवला आहे. कादंबरीत लिहिलेलं होतं की, ते होळीच्या सणात भाग घ्यायचे. लेझीम हा आपला पारंपारिक खेळ आहे. ते लेझीम का खेळले नसतील, असा प्रश्न आहे. पण शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर लेझीम चित्रपटापेक्षा मोठा नाही, तो डिलिट करण्यात येईल असं ते म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube