Flipkart Big Saving Days Sale : जर तुम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त नवीन स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याची तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट Flipkart एक जबरदस्त ऑफर घेऊन येत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता भारतीय बाजारात धुमाकूळ घालणारे iPhone 12 आणि iPhone 14 अवघ्या 20 हजारात खरेदी करू शकता.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart 3 मे पासून बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale) सुरू करणार आहे. या सेलमध्ये तुम्ही कमीत कमी किमतींमध्ये जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्हाला Flipkart कडून एक्सचेंज ऑफरही देण्यात येणार आहे.
iPhone 14 मध्ये A15 Bionic SoC चिप देण्यात आली आहे. या सेलमध्ये तुम्हाला iPhone 14 ब्लू कलर आणि 128GB व्हेरिएंटमध्ये खरेदी करण्यासाठी फक्त 54,999 रुपये मोजावे लागणार आहे. सध्या बाजारात iPhone 14 128GB व्हेरिएंटमध्ये खरेदी करण्यासाठी 69,900 रुपये खर्च येतो. मात्र तुम्हाला Flipkart 750 रुपयांचा कॅशबॅक देत आहे याच बरोबर 1500 रुपयांची सूट देखील देत आहे परंतु ही सूट मिवण्यासाठी Citi branded Credit Card द्वारे पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे.
तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart iPhone 14 खरेदीवर 47,100 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट ऑफर देत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही iPhone 14 स्वस्तात खरेदी करू शकतात.
तर iPhone 12 वर देखील तुम्हाला जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. बाजारात सध्या या फोनची किंमत 65,900 रुपये आहे. मात्र हा फोन Flipkart वर 40,999 रुपयांना विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे.
बाहेरून आलेल्या उमेदवाराला निर्यात करा, उद्धव ठाकरेंचा राम सातपुतेंवर निशाणा
या फोनवर तुम्हाला 38,600 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्ही iPhone 12 खरेदीसाठी HDFC बँक डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट देखील मिळणार याच बरोबर UPI ने पेमेंट केल्यास तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळू शकते.