E-Pharmacy Companies ला विनापरवाना औषध विक्री पडली महागात

E-Pharmacy Companies ला विनापरवाना औषध विक्री पडली महागात

नवी दिल्ली : विनापरवाना औषधं विक्री करणं ई-फार्मसींना (E-Pharmacy Companies) महागात पडलं आहे. डीजीसीआय म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळानं (Drugs Controller General of India) ऑनलाईन औषधं विक्री करणाऱ्यांना (Online Medicine App) कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. DCGI कडून औषधं आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 (Drugs and Cosmetics Act, 1940) कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. विनापरवाना औषधं विक्री करणाऱ्यांना औषधं विक्रेत्यांना नोटीस पाठवत त्यांच्यावर कारवाई का करू नये? याचं स्पष्टीकरण मागवलंय.

DCGI नं शुक्रवारी (दि.10) Tata1 MG, Amazon आणि Flipkart सह अनेक ऑनलाईन फार्मसींना नोटिसा बजावल्यात. या विक्रेत्यांविरोधात ऑनलाईन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे औषधं विक्रीच्या अनेक तक्रारी मिळाल्यात. या तक्रारी वेगवेगळ्या मोबाईल ॲपविरोधात आहेत. या कंपन्या ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स ॲक्ट, 1940 चं उल्लंघन करताहेत. त्यामुळं डीसीजीआयनं या ई-फार्मसींना नोटीसा बजावल्यात.

DCGI नं नोटीसमध्ये म्हटलंय की, ऑनलाईन औषधांच्या विक्रीमध्ये शेड्यूल H, HI आणि X या श्रेणीमधील औषधांचा समावेश आहे. या श्रेणीतील औषधं फक्त नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच विकण्याची परवानगी आहे. ही औषधं नोंदणीकृत फार्मासिस्टच्या देखरेखीखाली पुरविली जातात.

राज्यातील १७ लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांरी जाणार बेमुदत संपावर

कोणत्याही औषधाची विक्री, साठा किंवा वितरणासाठी संबंधित राज्य परवाना प्राधिकरणाकडून परवाना घेणं गरजेचं आहे. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 नुसार औषधांच्या तरतुदींद्वारे नियंत्रित केली जातात. DGCI च्या नोटीसीनुसार, औषध विक्रेत्यांना दोन दिवसामध्ये कारणे दाखविण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube