Download App

कमालच! वैज्ञानिकांनी शोधलं नवं पाणी; ‘प्लास्टिक आइस’ पाण्याची खासियत काय..

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. वैज्ञानिकांनी आत पाण्याचं चौथं रुप शोधून काढलं आहे.

Fourth Form of Water plastic Ice VII Discovered : पाण्याचे तीन रुप असतात हे आपल्याला ठाऊक आहे. पण पाण्याची ही तिन्ही रुपे आता जुनी झाली असेच म्हणावे लागेल. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. वैज्ञानिकांनी आत पाण्याचं चौथं रुप शोधून काढलं आहे. या पाण्याला प्लास्टिक आइस VII असे नाव देण्यात आले आहे. वैज्ञानिकांचा असाही दावा आहे की हे पाणी अन्य ग्रहांवर देखील असू शकते. फ्रांसीसी वैज्ञानिकांचा हा शोध खरच चक्रावून टाकणारा आहे. प्लास्टिक आइस पाणी अखेर तयार झालं तरी कसं याचा उलगडा वैज्ञानिकांनीच केला आहे.

पाण्याचे ठोस, द्रव आणि वायू असे तीन रुपे आपल्याला माहिती आहेतच. पण फ्रान्सच्या वैज्ञानिकांनी चौथ्या पाण्याचा शोध केला आहे. निदान त्यांचा तरी असाच दावा आहे. वैज्ञानिकांनी या पाण्याला प्लास्टिक आइस VII असे नाव दिले आहे. फ्रान्सच्या Institut Laue-Langevin (ILL) च्या वैज्ञानिकांनी पाणी तयार करण्यासाठी एक प्रयोग केला. हा नेमका काय प्रयोग आहे? याद्वारे पाणी कसं तयार झालं? याची रंजक कथा समजून घेऊ..

कसे बनले प्लास्टिक आइस VII

फ्रान्सच्या शोधकर्त्यांचं म्हणणं आहे की पाण्याचे नवे रुप अधिक दबाव आणि अधिक तापमानावर तयार झाले आहे. यासाठी वैज्ञानिकांनी गीगाफास्कल्सचा दबाव पाण्यावर टाकला. हा दबाव पृथ्वीवरील वायूमंडळाच्या एकूण दबावाच्या तब्बल 60 हजार पट जास्त होता. या पाण्याला 327 अंश सेल्सिअसपर्यंत गरम करण्यात आले. यानंतर पाण्याचे चौथे रुप म्हणजेच प्लास्टिक आइस VII तयार झाले. नव्या रुपातील पाणी तयार करण्यासाठी क्वासी इलास्टिक न्युट्रॉन स्कॅट्रिंग पद्धतीचा वापर करण्यात आला.

ग्लूकोमा नक्की काय? काळ्या मोतीबिंदूमुळे अंधत्वाचा धोका.. जाणून घ्या, लक्षणे अन् उपचार

नव्या रुपातील पाण्यात हायड्रोजन परमाणू वेगळ्याच पद्धतीने वर्तणूक करतात. याबाबतीत आधी जसा विचार करण्यात आला होता त्यापेक्षा ही स्थिती भिन्न आहे. त्यामुळे आधीच्या धारणा आता बदलल्या आहेत. या पाण्याच्या संरचनेत काय काय बदल दिसून आले हे देखील वैज्ञानिकांनी समजावून सांगितले आहे. प्लास्टिक आइस VII पाणी दुसऱ्या पद्धतीच्या पाण्याच्या तुलनेत वेगळे आहे. यातून पाण्याची नवीन वैशिष्ट्ये कळतात.

कसं आहे नवं पाणी

सॉलिड, लिक्विड आणि गॅस ही पाण्याची तीन रुपे सगळ्यांनाच माहिती आहेत. प्लास्टिक आइस VII मध्ये पाणी आणि सॉलिड या दोघांचे गुणधर्म आहेत. यामुळे या पाण्याचे नाव प्लास्टिक आइस ठेवण्यात आले. या पाण्याची संरचना एकदमच वेगळी आहे. कारण यात हायड्रोजनचा क्रम अन्य पाण्याच्या तुलनेत वेगळाच आहे. आता पाण्याचं हे नवं रुप आपल्या सौरमंडळातील अन्य ग्रह आणि चंद्रांवर देखील असू शकते असा विश्वास वैज्ञानिकांना वाटतो आहे. पाण्याची आणखीही रुपे समोर येऊ शकतात. त्यामुळे भविष्यातील पाणी कसं असेल, त्यात काय खास असेल याची माहिती मिळणं अद्याप बाकी आहे.

आता डिजिटल पेमेंटही होणार महाग, UPI व्यवहारांवर द्यावा लागणार चार्ज ?

follow us