Share Market Froud : जास्त कष्ट न करता झटपप पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करताना दिसतात. पण अनेकदा यामध्ये फसवणूक झाल्याचे प्रकारही उघडकीस आले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे प्रकार घडले. शेअर्समध्ये गुंतवणूक करून दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून मोठ्या रकमा गोळा करून तीन ते चार जण हे पाच दिवसांपासून पसार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
राज्यात आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता, विदर्भ-मराठवाड्याला येलो अलर्ट
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतरही बदनामी आणि चौकशीला ससेमिरा नको म्हणून अनेकजण संबंधित लोकांविरुद्ध तक्रार करण्यास टाळाटाळ करतात, अशी माहिती आहे.
अनेक तरुण शेअर मार्केटकडे आकर्षित झाले आहेत. काही महिन्यांतच ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी आलीशान कार्यालये थाटली आहेत. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धकांपेक्षा अधिक परतावा देण्याची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. गुंतवणुकीवरील परतावा 7 ते 28 टक्के दरमहा इतक्या मोठ्या प्रमाणावर दिला जातो. या कंपन्यांकडून गुंतवणुकीच्या रकमेसोबत हमी बॉंडही घेतले जात आहेत.
बैठक बोलावली पण पदाधिकाऱ्यांची दांडी, राज ठाकरे पुण्यातून बैठक न घेताच माघारी परतले
लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या दलालांना गुंतवणुकीच्या रकमेच्या एक ते दोन टक्के कमिशन दिले जाते. कोणतीही गुंतवणूक न करता मोठ्या प्रमाणात तरुण दलालांची साखळी कार्यरत आहे. त्यांना विश्वास देण्यासाठी अगोदर परतावा मिळालेल्या लोकांचे दाखले दिले जात आहेत. शेअर बाजारातील शेअर्स खरेदी करून खरोखरच इतका मोठा परतावा मिळतो का? याची खात्री करण्याच्याही भानगडीत कोणी पडत नाही. भरघोस परताव्याच्या आमिषाने संबंधितांनी शेकडो एकर जमीन व स्थावर मालमत्ता जवळपासच्या विविध तालुक्यांमध्ये तसेच परदेशात विकत घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये संबंधितांनी पैसे घेऊन पलायन केल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, फसवणूक झाल्याची तक्रार कोणी करत नाही. उगाच चौकशीचा ससेमिरा नको म्हणून गुंतवणूकादर तक्रार करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळं सर्व काही गुलदस्त्यात आहे.
प्राप्तिकर विभागाचे याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांची फसवणूक झाल्यानंतर संबंधित यंत्रणा कार्यान्वित होणार का? असा सवाल सुजाण नागरिक करत आहेत. दुसरीकडे याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. तक्रार आल्यानंतर कारवाई करता येईल, असे ते म्हणाले.