Download App

FSSAI मध्ये विविध पदांची भरती, महिन्याला 1,77,500 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

एफएसएसएआय अतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. या भरतीद्वारे 'सहाय्यक संचालक' आणि 'प्रशासकीय अधिकारी' ही पदे भरली जाणार आहेत.

FSSAI Recruitment 2024 : देशातील एक महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या एफएसएसएआय म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India) अंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. या भरतीद्वारे ‘सहाय्यक संचालक’ (Assistant Director) आणि ‘प्रशासकीय अधिकारी’ (Administrative Officer) ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा करावा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.

कॉंग्रेस-आपची युती संपुष्टात? दिल्ली आणि हरियाणामध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा 

एकूण पदे – 11

पदांचा तपशील –
सहाय्यक संचालक पदासाठी एकूण 5 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
तरप्रशासकीय अधिकारी पदासाठी एकूण 6 पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता-

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे सर्व तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. इच्छुक उमेदवारांनी FSSAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा अधिसूचना वाचून सहाय्यक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय आहे ते समजून घ्यावं.

Government Schemes : दिव्यांग वैवाहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार? 

पगार
सहाय्यक संचालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 56,100/- ते 1,77,500/- रुपये (वेतन स्तर- 10) इतके वेतन दिले जाणार आहेत.
प्रशासकीय अधिकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 47,600/- ते 1,51,100/- रुपये [वेतन स्तर- 08] वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024

अधिकृत वेबसाइट लिंक –
https://www.fssai.gov.in/jobs@fssai.php

अधिसूचना लिंक –
https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/shortnotice.pdf
https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/Circular%20for%20extension.pdf
https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/Previous%20Notice%20dated%2008_01_2024.pdf

अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.
उमेदवारांनी नोकरीच्या अर्जात त्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी FSSAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना वाचावी त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्ज करतांना अर्जात कोणताही चुक राहिल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.

follow us