अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल करत एक कोटी खंडणी : कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई

अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल करत एक कोटी खंडणी : कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई

नाशिक : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या कृषी सहाय्यक सारिका सोनवणे (Sarika Sonawane) (42) महिलेला निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय खातेनिहाय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. या प्रकणात सारिका सोनवणे आणि मुलगा मोहित हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. (Agriculture assistant Sarika Sonwane suspended in threat and extortion case)

याबाबत अधिक माहिती अशी की, सारिका सोनवणे ही नाशिक जिल्हयातील निफाड येथे कृषी सहायक अधिकारी म्हणून कार्यरत होती. यादरम्यान, स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (54) यांचे आणि सोनवणे यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते.

Jayakwadi Dam : आंदोलनं, विरोध, ठराव… अखेर नगर-नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले

याच गोष्टीचा फायदा उचलत शिरसाट यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यावरुन वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ केले जात होते. त्यांच्याकडून आतापर्यंत वेगवेगळ्यावेळी सुमारे 1 कोटी रुपयांची खंडणी संशयित सारिका सोनवणे आणि मोहित सोनवणे यांनी उकळली असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, चार ऑक्टोबरपासून सोनवणे वैद्यकीय रजेवर होती. मागील काही दिवसांपूर्वी तिने शिरसाट यांच्याकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. हे पैसे घेताना सारिका सोनवणेसह तिचा मुलगा मोहित यांना गंगापूर पोलिसांनी 18 नोव्हेंबरला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती.

Ahmednagar Crime : धक्कादायक! जागेच्या वादात माय लेकरांचा बळी; शेजाऱ्याने थेट अंगावरच…

निलंबित सारिका सोनवणे हिच्यासह मुलगा मोहित यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर कृषी सहसंचालकांनी सारिका सोनवणे यांच्या निलंबनाचा आदेश काढला असून तिची चौकशी केली जाणार आहे. यात सेवा काळात कोणा – कोणाची फसवणूक केली आहे का? याची देखील चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube