Ahmednagar Crime : धक्कादायक! जागेच्या वादात माय लेकरांचा बळी; शेजाऱ्याने थेट अंगावरच…

Ahmednagar Crime : धक्कादायक! जागेच्या वादात माय लेकरांचा बळी; शेजाऱ्याने थेट अंगावरच…

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात नुकताच किरकोळ वादाचा शेवट देखील अत्यंत भयानक होत असतो. याचाच प्रत्यय जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्या-शेजाऱ्यांचे असलेल्या वादातून एकाने आपल्या चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालवत थेट मायलेकांना गाडी खाली चिरडले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शितल अजय येणारे (वय 27, रा.कुंभारगल्ली पारनेर) व स्वराज येणारे या दोघांचा मृत्यू झाला. तर या घटनेतील आरोपी फरार झाला आहे.

Sanjay Raut : मोदींची जादू बघू, पण गेहलोत प्रोफेशनल जादूगार; राजस्थान निवडणुकीबाबत राऊतांचा दावा

याबाबत अधिक माहिती अशी, येणारे कुटुंबीय व घटनेतील हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर हे शेजारी शेजारी राहत होते. घरा शेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता अशी माहिती समजते आहे. गुरुवारच्या दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये शितल अजय येणारे (वय 27, रा.कुंभारगल्ली, पारनेर) या त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा स्वराज अजय येणारे यास घेऊन घराच्या ओट्यावर बसल्या होत्या.

हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावातच’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोचं ‘गावरान वेलकम’ गाणं रिलीज! एकदा पाहाच….

अचानक एक कार येणारे यांच्या घराच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. शितल येणारे यांच्या घराजवळ आल्यानंतर कारने येणारे यांच्या घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारने दारात बसलेल्या शितल व स्वराज यांना चिरडले. या अपघातात स्वराज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

दरम्यान अपघाताची माहिती समजल्यानंतर परिसरातील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत कार शितल यांना बाजूला काढले. दोघांनाही पारनेरच्या खाजगी रूग्णालयात नेण्यात आले असता त्यांना नगर येथे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र नगर येथे पोहचण्यापूर्वीच शितल यांचा वाटेतच मृत्यू झाला.तर स्वराज याला नगरमधील विखे हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्याचा देखील मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला यांनी फिर्याद दिली असून हल्लेखोर आरोपी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube