Sanjay Raut : मोदींची जादू बघू, पण गेहलोत प्रोफेशनल जादूगार; राजस्थान निवडणुकीबाबत राऊतांचा दावा

Sanjay Raut : मोदींची जादू बघू, पण गेहलोत प्रोफेशनल जादूगार; राजस्थान निवडणुकीबाबत राऊतांचा दावा

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत राजस्थान निवडणुकीबाबत एक दावा केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत. की, राजस्थानमध्ये अशोक गहलोत हेच जिंकणार आहेत. त्याचबरोबर हा दावा करताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना देखील टोला लगावला आहे.

पण गेहलोत प्रोफेशनल जादूगार…

राजस्थान निवडणुकीबाबत अशोक गहलोत हेच जिंकणार हा दावा करतताना राऊत म्हणाले की, मोदींची जादू कुठे-कुठे चालू आहे? ते बघून घेऊ, मात्र अशोक गेहलोत प्रोफेशनल जादूगार आहेत. ते जादूने काहीही गायब करू शकतात. तसेच ते त्यांच्या टोपीमधून काहीह बाहेर काढू शकतात. राजस्थानमध्ये भाजपची स्थिती जर पाहिली तर अशोक गहलोत हेच जिंकणार अशी स्थिती आहे. असं राऊत म्हणाले आहेत.

हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावातच’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोचं ‘गावरान वेलकम’ गाणं रिलीज! एकदा पाहाच….

दरम्यान यावेळी राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे इस्त्रायल (Israel) खवळून उठला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर इस्त्रायलने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता इस्त्रायली दूतावासाने विदेश मंत्रालय आणि लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून या पत्रात संजय राऊतांच्या ट्विटरवरील पोस्टबाबत टीका केली आहे.

‘हिटलर’चं नाव घेत पोस्ट केली, नंतर डिलीट केली तरीही इस्त्रायल भडकलाच; संजय राऊतांनी नेमकं काय केलं?

संजय राऊतांनी केला खुलासा

युद्धाचे पण काही नियम असतात, महाभारत काळापासून ते सुरू आहेत. इस्रायलमध्ये जाऊन हमासने निर्घृणपणे हल्ला केला. ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे हमासच्या अतिरेक्यांकडून ज्या पद्धतीने बंदी करून हत्या केली जात आहे, त्याचा आम्ही धिक्कार केला. नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यांचं दूध पाणीपुरवठा थांबवला गेला. मुलं तडफडत होती त्यावर मी एक टिप्पणी केली त्यामुळे इस्रायलच्या भावना दुखावल्या असतील. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. भारतातील नेहरुंची जी भूमिका होती तीच आमचीही आहे. हिटलरचा संदर्भ दिला मात्र त्यानंतर मी संदर्भ काढून टाकला. सामनामधून मी लेख लिहिला त्यात लिहिलं हिटलर हा भारताचा मोठा शत्रू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube