Download App

सिबील स्कोअर ओके तरीही बँक कर्ज देत नाही? तुम्हालाही आलाय अनुभव, मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच!

बऱ्याचदा बँका संबंधित अर्जदाराच्या आणखीही काही आर्थिक बाबींची माहिती घेतात. त्या आधारावर कर्जाची रक्कम, व्याज दर आणि कर्ज द्यायचे की नाही या गोष्टी निश्चित केल्या जातात.

CIBIL Score For Loan : सिबील स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर कर्ज आणि क्रेडिट बिलाशी (CIBIL Score) संबंधित असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला (Credit Score) असेल तर कर्ज मिळणे सोपे होते. तसेच व्याजदरही कमी आकारला जातो. परंतु, आता फक्त क्रेडिट स्कोअर पाहूनच बँका कर्ज देतात अशी परिस्थिती राहिलेली नाही. बऱ्याचदा बँका संबंधित अर्जदाराच्या आणखीही काही आर्थिक बाबींची माहिती घेतात. त्या आधारावर कर्जाची रक्कम, व्याज दर आणि (Interest Rate) कर्ज द्यायचे की नाही या गोष्टी निश्चित केल्या जातात.

या सगळ्या गोष्टी तुमच्या उत्पन्नाशी निगडीत असतात. जो व्यक्ती कर्जाचे हप्ते अगदी सहज आणि नियमितपणे भरू शकतो अशाच व्यक्तीला कर्ज देण्याकडे बँका आणि वित्तीय संस्थांचा ओढा असतो. याच क्षमतेचे मोजमाप करण्यासाठी सिबिल स्कोअर व्यतिरिक्त उत्पन्नाशी संबंधित आणखी काही गोष्टी तपासल्या जातात.

बँका कोणत्या गोष्टींची माहिती घेतात

अर्जदाराचे काही स्थायी उत्पन्न आहे का ही गोष्ट सर्वात आधी तपासली जाते. कारण जर अर्जदाराला नियमित उत्पन्न मिळत असेल तरच तो कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकतो असे बँकांना वाटते. त्यामुळे अर्जदाराचे उत्पन्नाचे मार्ग काय आहेत याची माहिती बँकांकडून घेतली जाते.

अर्जदार नोकरी करत असेल तर तो कोणत्या कंपनीत काम करत आहे, किती काळापासून तो कंपनीत काम करतोय, नोकरीतून मिळणारे मासिक आणि वार्षिक उत्पन्न किती आहे याची माहिती बँका घेतात.

काय, तुमच्या पॅनकार्डवर दुसराच कर्ज घेतोय? टेन्शन घेऊ नका; माहिती घ्या, स्टेप बाय स्टेप..

व्यवसाय करणारा अर्जदार असेल तर व्यवसायातून त्याला स्थिर उत्पन्न मिळत आहे का? कोणता व्यवसाय तो करतोय? किती काळापासून व्यवसाय केला जात आहे? व्यवसायातून त्या व्यक्तीला मासिक आणि वार्षिक किती उत्पन्न मिळते याची माहिती बँका घेतात.

Debt to Income Ratio देखील बँका आणि वित्तीय संस्थांसाठी महत्वाचा असतो. यावरून लक्षात येते की एखादा व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत किती कर्ज परत करत आहे. तसेच तो आणखी कर्ज परत करण्याच्या स्थितीत आहे का? याचेही उत्तर या रेशोतून मिळते.

गुणोत्तर मिळवण्याचे काही मार्ग

एखाद्या व्यक्तीचा Debt to Income Ratio 40 ते 50 टक्के असेल तर अशा व्यक्तीला कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात. कारण अशा व्यक्तींना यापेक्षा जास्त उधारी आणि अन्य प्रकारचे देणे परत करण्यात अडचणी येऊ शकतात अशी बँकांची धारणा असते.

नोकरीचा इतिहास

कर्ज देताना बँक संबंधित व्यक्ती याआधी कोणत्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत आला आहे याची माहिती घेतात. व्यक्ती वारंवार नोकरी बदलत आहे का किंवा एकाच कंपनीत दीर्घ काळापासून काम करतोय. जर एखादा अर्जदार बऱ्याच वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत असेल तर किंवा सरकारी नोकरीत असेल तर अशा अर्जदाराला अगदी सहज कर्ज मिळते.

कर्ज घेण्याचा हेतू

साधारणपणे असुरक्षित कर्जाच्या (पर्सनल लोन) तुलनेत सुरक्षित कर्ज मिळण्यात अडचणी नसतात. कारण सुरक्षित प्रकारच्या कर्जात बँका हमी म्हणून Collateral ठेवतात. असुरक्षित कर्जात अशा प्रकारची काहीच सोय नसते. अशा वेळी बँका अर्जदाराचा कर्ज घेण्याचे हेतू तपासतात. कोणत्या कारणासाठी कर्जाची मागणी केली आहे. अशा प्रकारे बँका सिबिल स्कोअरसह या अन्य गोष्टी तपासून अर्जदाराला कर्ज द्यायचे की नाही याचा निर्णय घेतात.

भारतीय विद्यार्थ्यांचं विमान ऑस्ट्रेलियात, शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच फेव्हरेट; अमेरिका, कॅनडा पछाडले!

follow us