भारतीय विद्यार्थ्यांचं विमान ऑस्ट्रेलियात, शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच फेव्हरेट; अमेरिका, कॅनडा पछाडले!

भारतीय विद्यार्थ्यांचं विमान ऑस्ट्रेलियात, शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच फेव्हरेट; अमेरिका, कॅनडा पछाडले!

Indian Student in Australia : एका नव्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया भारतीय विद्यार्थ्यांसाठी (Australia) सर्वाधिक योग्य आंतरराष्ट्रीय स्टडी डेस्टिनेशन बनले आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षा प्रदाता IDP Education द्वारे मार्च 2025 मध्ये करण्यात आलेल्या Emerging Futures Seven Voice of the International Student सर्वेनुसार ऑस्ट्रेलियाने अमेरिकेला पछाडत पहिला क्रमांक मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाची जगभरातील मजबूत रँकिंग आणि भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य व्यापार करारामुळे (India Australia Cooperation) ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळाली आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2025 मध्ये ऑस्ट्रेलियातील 15 युनिव्हर्सिटी टॉप 200 मध्ये सहभागी आहेत. यावरून ऑस्ट्रेलियातील शिक्षणाचा दर्जा आणि येथील शैक्षणिक सोयी सुविधा किती सुधारल्या आहेत याचा अंदाज येतो.

हिंदीच्या सक्तीबाबत राज्य सरकार एक पाऊल मागे; मोठ्या विरोधानंतर शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

कॅनडाच्या लोकप्रियतेत मोठी घसरण

कॅनडातील वातावरण शिक्षणाच्या (Education in Canada) दृष्टीने प्रतिकूल होत आहे. सर्वेत एकूण 6 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील जवळपास 1400 भारतीय विद्यार्थी होते. यातील 28 टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रेलियाला प्रथम प्राधान्य दिले. 22 टक्क्यांसह अमेरिका दुसऱ्या तर 21 टक्क्यांसह यूके तिसऱ्या (United Kingdom) क्रमांकावर राहिला. कॅनडाच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षातील 19 टक्क्यांवरून आता 13 टक्क्यांवर आली आहे.

अमेरिका अजूनही शिक्षण, करिअर संधींच्या बाबतीत चांगला पर्याय आहे. परंतु, भारतीय विद्यार्थी अजूनही शिक्षणाचा खर्च आणि आर्थिक मदत यांसारख्या घटकांना जास्त प्राधान्य देत आहेत. अमेरिकेची अजूनही कायम आहे. परंतु, आता अन्य देशांतही शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया यात आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीयांसह अन्य देशांतील विद्यार्थ्यांचा ऑस्ट्रेलियाकडे ओढा वाढला आहे.

शिक्षणाच्या खर्चाचं मोठं टेन्शन

सर्वेत 66 टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च सर्वात मोठं टेन्शन असल्याचे म्हटले आहे. 47 टक्के विद्यार्थ्यांनी व्हिसा आव्हाने, 43 टक्के विद्यार्थ्यांनी हाउसिंग खर्च तर 39 टक्के विद्यार्थ्यांनी पार्ट टाइम नोकरीसह शिक्षण आव्हानात्मक असल्याचे सांगितले. 55 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की स्कॉलरशीप मिळाल्याने त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनमध्ये बदल करता येऊ शकतो. तर 54 टक्के विद्यार्थ्यांनी पार्ट टाइम वर्कचा पर्याय महत्वाचा असल्याचे सांगितले.

रिपोर्टनुसार 77 टक्के भारतीय विद्यार्थी विदेशातील (Indian Student) शिक्षणाचा मुख्य उद्देश चांगले करिअर आणि उत्पन्नाच्या शक्यता मानतात. ऑस्ट्रेलियाची विद्यार्थी केंद्रीत धोरणे आणि शैक्षणिक प्रतिष्ठा भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ठरत आहे.

भारतीयांना व्हिएतनामची भुरळ! 5 कारणे माहिती करुन घ्या अन् व्हिएतनाम गाठाच..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube