Google removed Indian apps from Play Store : गुगलने (Google) आपल्या प्ले स्टोअरवरून (Play Store) काही भारतीय ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. गुगलच्या या निर्णयाला अनेक स्टार्टअपचे सीईओ आणि संस्थापक यांनी विरोध केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने देखील तीव्र आक्षेप घेतला होता. मोठा विरोध झाल्यानंतर गुगलने आपला निर्णय बदलला आहे. Shaadi.comसह अनेक ॲप पुन्हा प्ले स्टोअरवर उपब्लध होणार आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी गुगलने प्ले स्टोअरवरून 10 भारतीय ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी आली होती. यामध्ये Shaadi.com, Naukri.com, 99 acres अशा ॲपचा समावेश होता. गेल्या वर्षी कंपनीने काही ॲप डेव्हलपर्सनाही इशारा दिला होता.
यानंतर केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुगलच्या या निर्णयावर कठोर भूमिका घेतली होती. ॲप काढून टाकण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा वाद मिटवण्यासाठी सरकारने गुगल आणि ॲप मालकांसोबत बैठकही आयोजित केली होती, मात्र बैठक होण्यापूर्वीच गुगलने आपला निर्णय मागे घेतला. अश्विनी वैष्णव यांनी पीटीआयला सांगितले की, स्टार्टअप इकोसिस्टम ही भारतीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे.
भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? रामदासभाई एवढे का चिडले?
काय होतं संपूर्ण प्रकरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण सेवा शुल्क न भरण्याबाबत होते. यानंतर गुगलने हे ॲप्स प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. Google प्रमाणे शुल्क आकारू नये असे अनेक स्टार्टअप्सचे म्हणणे होते. नंतर त्यांनी पेमेंट केले नव्हते. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले होते.
गुगलला टीकेला सामोरे जावे लागले
गुगलच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. कुकू एफएमचे सीईओ लालचंद बिशू यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून गुगलवर टीका केली आणि त्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. Naukri.com आणि 99acres चे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनीही पोस्ट करून गुगलवर आपली नाराजी व्यक्त केली होती.
बारामतीत शरद पवार यांच्या पुन्हा करामती….. अजितदादांच्या प्लॅनला असा लावला सुरूंग!
After the intervention of Union Minister of Electronics & IT, Ashwini Vaishnaw, Google has restored its all apps. The minister has called a meeting with Google on Monday: Government sources
— ANI (@ANI) March 2, 2024
या ॲप्सवर कारवाई करण्यात आली होती
कुकू एफएम, भारत मॅट्रिमोनी, शादी डॉट कॉम, नौकरी डॉट कॉम, 99 acres, ट्रूली मॅडली, क्वाक क्वॅक, स्टेज, एएलटीटी (अल्ट बालाजी) आणि इतर दोन ॲप्सवर गुगलने कारवाई केली होती.
Sujay Vikhe : 50 हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी…