Sujay Vikhe : 50 हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी…

Sujay Vikhe : 50 हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी…

Sujay Vikhe : कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं (Central government)तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यातबंदी उठवली आहे. आता देशातील 50 हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. सदरील कांदा हा बांग्लादेशात (Bangladesh)निर्यात केला जाणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil)यांनी दिली.

सई परांजपे यांचं ‘इवलेसे रोप’ रंगभूमीवर; मंगेश कदम अन् लीना भागवत मध्यवर्ती भूमिकेत

दरम्यान कांद्यावरील निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.

सात दिवसांतच ‘आर्टिकल 370’चा वेग मंदावला, कमावले फक्त इतके कोटी, तर ‘क्रॅक’नेही केली निराशा

या भेटीत शेतकऱ्यांची कांद्याच्या भावाअभावी होणारी अडचण लक्षात आणून देत न्याय देण्यासंदर्भात सखोल चर्चा केली होती. आता तब्बल 50 हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाल्याने मोठे यश विखे पितापुत्राच्या पाठपुराव्याला मिळाले आहे.

या निर्णयामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच सदरील प्रश्नासाठी पाठपुरावा करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज