सात दिवसांतच ‘आर्टिकल 370’चा वेग मंदावला, कमावले फक्त इतके कोटी, तर ‘क्रॅक’नेही केली निराशा
Article 370 Box Office Day 7: आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतम (Yami Gautam) स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370) दररोज कमाई करत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया…
‘आर्टिकल 370’ बॉक्स ऑफिसवर चमकला: या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. यामी गौतमच्या अभिनयाने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आर्टिकल 370’ ने रिलीजच्या सातव्या दिवशी 57.14 तर सहाव्या दिवशी 3.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा प्रारंभिक अंदाज असला तरी. अधिकृत डेटा आल्यानंतर थोडे बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 7 दिवसांचे एकूण कमाई 57.14 कोटी रुपये आहे.
20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आपला खर्च वसूल करण्यात यशस्वी ठरला आहे. यामीच्या चित्रपटाला भारतातूनच नव्हे तर जगभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 5 दिवसात 48.91 कोटी रुपये कमवले आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट लवकरच अर्धशतक पूर्ण करणार आहे.
Devoleena Bhattacharjee: गोपी बहूने थेट पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत; म्हणाली…
चित्रपटाची स्टार कास्ट: या चित्रपटात यामी गौतम एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत दिसत आहे. तर, अरुण गोविल चित्रपटात पीएम मोदींच्या भूमिकेत छान दिसत आहे. यामी आणि अरुण गोविल यांच्याशिवाय प्रियमणी, किरण करमरकर यांच्यासह इतर कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे. याआधी त्याने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाची निर्मिती केली होती.
पीएम मोदींनीही कौतुक केले: देशाचे पंतप्रधान नरेंद्र सिंह मोदी यांनी ‘आर्टिकल 370’ चे खूप कौतुक केले आहे. या चित्रपटाद्वारे लोकांना योग्य माहिती मिळेल, असे ते म्हणाले होते.