कलम 370 देशाच्या एकात्मतेत अडथळा, त्यामुळे ते रद्द…; PM मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर
PM Narendra Modi : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरू आहे. या अधिवेशनात आज संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) संसदेत या चर्चेत भाग घेत संविधानावर भाष्य केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचाही उल्लेख केला. यावेळी कलम 370 (Article 370) हे एकात्मतेला अडथळा होते, त्यामुळं ते रद्द केल्याचं मोदी म्हणाले.
काँग्रेसच्या माथ्यावरील पाप कधीच धुतलं जाणार नाही; लोकसभेतून PM मोदींचा जोरदार ‘प्रहार’
पंतप्रधान मोदी संसदेला संबोधित करतांना म्हणाले की, भारतीय राज्यघटना स्वीकाकरून 75 वर्षे पूर्ण झालीत. आपल्या सर्वांसाठी, सर्व देशवासियांसाठी, जगातील लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा सण मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही संधी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही होण्याच्या या प्रवासाच्या केंद्रस्थानी आपल्या संविधान निर्मात्यांचे दूरदर्शी योगदान आहे, ज्याच्या मदतीने आपण पुढे जात आहोत. 75 वर्षे पूर्ण करणे हा आनंदाचा क्षण आहे.
पुढं ते म्हणाले की, राज्यघटना स्वीकारून 75 वर्षे झालीत. आपल्याकडे 25 वर्षे वर्षाचंही महत्व असते. तसंच 50 वर्षाचंही महत्व असतं. मात्र, आपण इतिहासावर नजर टाकली तर देशात संविधानाला 25 वर्षे पूर्ण होत असताना आपल्या देशात संविधान हटवण्याचा प्रयत्न झाला. आणीबाणी लागू करण्यात आली. सर्व घटनात्मक व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. जगात जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा-तेव्हा हे कॉंग्रेसच्या डोक्यावरचे पाप दिसेल, असा हल्लाबोल मोदींनी केला.
पुढं ते म्हणाले, विविधतेतील एकता ही भारताची ताकद आहे. मात्र, आपल्या देशातील एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, जर तुम्ही आमची धोरणे पाहिली तर आम्ही भारताची एकता मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. कलम 370 देशाच्या एकात्मतेत अडथळा होतं. ते कलम एक एकात्मतेमध्ये भिंत बनले होते. त्यामुळं ते रद्द करण्यात आले. देशाची एकता ही आमची प्राथमिकता आहे,असं मोदी म्हणाले.